Suhani Bhatnagar Death : बॉलिवूड हळहळले! ‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन, अवघ्या १९ व्या वर्षी घेतला निरोप

मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त करणारी समोर आली आहे. ‘दंगल’ (Dangal) चित्रपटात छोट्या बबिता फोगाटची (Babita Phogat) भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar) हिचे अवघ्या १९ व्या वर्षी निधन झालं आहे.

Suhani Bhatnagar Death

बॉलिवूड हळहळले! ‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन, अवघ्या १९ व्या वर्षी घेतला निरोप

मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त करणारी समोर आली आहे. ‘दंगल’ (Dangal) चित्रपटात छोट्या बबिता फोगाटची (Babita Phogat) भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar) हिचे अवघ्या १९ व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाची बातमी समोर येतात कुटुंबीयांसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

एका वृत्तवाहीनीने दिलेल्या वृत्तानुसार, सुहानी हिचा पाय फ्रॅक्चर झाला होता त्यासाठी तिच्यावर फरीदाबाद येथील एम्स रुग्णालयात उपचार चालू होते. दरम्यान औषधांचा तिच्या शरीरावर दुष्परिणाम झाला तिच्या शरीरात अतिरिक्त द्रव जमा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे कारण समोर आले. (Suhani Bhatnagar Death)

सुहानी भटनागर हिच्यावर उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली आहे. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी सुहानी भटनागर हिचे निधन झाल्याने आता मनोरंजन विश्वातून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. रिपोर्टनुसार, सुहानी तिच्या कुटुंबासोबत फरीदाबादमध्ये राहत होती. शनिवारी सकाळी उपचारांदरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. अजरोंदा येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story