ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर !

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड लूक आणि सौंदर्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखले जाते. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातही ती सहभागी झाली होती. रुचिरा जाधव ही तिच्या स्पष्टपणासाठी ओळखली जाते. आता नुकतेच रुचिरा जाधवने ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Wed, 19 Jun 2024
  • 03:29 pm
Entertainment news

संग्रहित छायाचित्र

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड लूक आणि सौंदर्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला (Ruchira Jadhav)ओळखले जाते. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातही ती सहभागी झाली होती. रुचिरा जाधव ही तिच्या स्पष्टपणासाठी ओळखली जाते. आता नुकतेच रुचिरा जाधवने ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे.

रुचिरा जाधवने ईदनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. यावेळी तिने ईद मुबारक, एका ट्रॅव्हल शोसाठी बहरीनमध्ये शूटिंग करताना खूप छान अनुभव आला, असे म्हटले होते. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिला ट्रोल केले. “ईद मुबारक वगैरे कशाला? मराठी सण आहेत एवढे मग हे कशाला?? अशी कमेंट एकाने केली होती. “अनफॉलो”, “हिला अनफॉलो करा” अशा कमेंटही अनेकांनी केल्या होत्या. यावरून रुचिराने स्पष्ट शब्दात मोठी पोस्ट शेअर करत कमेंट केली आहे.

सोशल मीडियावर मला इतक्या मोठ्या प्रमाणात दिसून येणारा द्वेष लक्षात घेता धक्काच बसला. मी डेनिम, स्कार्फ आणि शेड्स असलेली कुर्ती परिधान केली होती. हा माझा ‘पोशाख’ आहे. मी जे करतेय ते माझे काम आहे. कर्म आणि धर्म ‘पूर्णपणे समजणाऱ्यांसाठी ही पोस्ट आहे. बाकीच्या लोकांना काय बोलावे हे मला खरेच कळत नाही. महाराजांचा उल्लेख करणाऱ्यांना विचारायचं आहे, ‘महाराजांनी कधी दुसऱ्या धर्माचा अनादर करायला शिकवले ? ज्या लोकांनी माझ्या इन्स्टाग्राम बायोसंदर्भात प्रश्न उपस्थित केले त्यांना 'गीतेतला कर्मयोग समजला असता, तर तुमची रिॲक्शन वेगळी असती' तुमच्या भावनांचा आदर आहेच, पण याचा अर्थ असा नाही की, तुमचा दृष्टिकोन प्रत्येक वेळी योग्य असावा. हरे कृष्णा !

मी काय करतेय हे मला माहिती आहे.” अशा शब्दात रुचिराने ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे. दरम्यान रुचिरा जाधवने 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत माया हे पात्र साकारले होते. यामुळे ती घराघरात लोकप्रिय झाली. काही दिवसांपूर्वी तिने  ‘ठरलं तर मग’ मालिकेत एक लहानशी भूमिका साकारली होती. तसेच काही दिवसांपूर्वी तिने नवीन घर आणि गाडी खरेदी केली आहे. ती सोशल मीडियावरही सतत सक्रिय असते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story