घटस्फोटाच्या चर्चेत ‘बिग बी’ यांच्या पोस्टची भर
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan ) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राॅय (Aishwarya Rai) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना अमिताभ (Amitabh Bachchan) यांनी या विषयाकडे निर्देश करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली असून त्यामुळे अभि-ॲश प्रकरणातील चर्चेची तीव्रता वाढली आहे.
घटस्फोटाच्या चर्चा रंगल्यानंतर अनेक ठिकाणी ऐश्वर्या लेक आराध्या हिच्यासोबत स्पॉट झाली. दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्या पहिल्या सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी संपूर्ण बच्चन कुटुंबाला एकत्र स्पॉट करण्यात आलं, पण तेव्हा जया बच्चन आणि श्वेता बच्चन-नंदा सतत ऐश्वर्याकडे पाठ फिरवताना दिसल्या, अशी चर्चादेखील चाहत्यांमध्ये रंगली. एवढंच नाही तर, सिनेमाच्या स्क्रीनिंगनंतर ‘बिग बी’ यांनी सून ऐश्वर्याला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्याचीदेखील चर्चा आहे. आता ‘बिग बी’ यांची एक सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
अमिताभ यांनी इन्स्टाग्रामवरून ऐश्वर्याला अनफॉलो केल्याची चर्चा रंगत असताना, बिग बी यांनी एक ट्विट केलं आहे. बिग बी यांच्या एका ट्विटमुळे चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांनी स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अमिताभ बच्चन यांनी लिहिलेल्या कॅप्शनमुळे चाहतेदेखील हैराण झाले आहेत. स्वतःचा फोटो पोस्ट करत अमिताभ म्हणतात, ‘‘सर्व काही बोलून झालं आहे, सर्व काही करूनदेखील झालं आहे… जे करायचं होतं, ते केलं... जे केलं ते आता केलं…’’
अमिताभ यांच्या या पोस्टमुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. बच्चन कुटुंबात सध्या वाद सुरू असल्यामुळे बिग बी यांनी अशी पोस्ट केली, असं त्यांच्या चाहत्यांचं म्हणणं आहे, पण यावर बच्चन कुटुंबातील एकाही सदस्याने अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
अमिताभ यांच्या इन्स्टाग्रामबद्दल सांगायचं झालं तर, ते ७४ लोकांना फॉलो करतात. यामध्ये सलमान खान, अभिषेक बच्चन, कॅटरिना कैफ, आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, विराट कोहली, श्वेता बच्चन-नंदा, नव्या नवेली नंदा, प्रियांका चोप्रा, तापसी पन्नू, अहाना कुमरा, कुणाल खेमू, शिल्पा शेट्टी आणि अरमान मलिक यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. आपली सून ऐश्वर्याला ते फॉलो करायचे की नाही, याबद्दल काही कळू शकलं नाही. ऐश्वर्याबद्दल सांगायचं झालं तर, ती इन्स्टाग्रामवर फक्त पती अभिषेकला फॉलो करते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.