तृप्ति कडून 'बॅड न्यूज' : बाळ नक्की कोणाचं? विकीचं की एमीचं

विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांच्या 'बॅड न्यूज' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यामध्ये एमी विर्कसोबत विकीने कॉमेडीचा अप्रतिम तडका दिला आहे. विकीची अप्रतिम शैली आणि अभिनय चाहत्यांची मने जिंकत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Sat, 29 Jun 2024
  • 05:21 pm
Entertainment news, bad new movie

संग्रहित छायाचित्र

रणबीर कपूर च्या ‘ॲनिमल’चित्रपटातील  तृप्ति डिमरी च्या ‘जोया’ह्या भूमिकेने प्रेक्षकांची  मने जिंकली  होती . त्यामुळे ती रातोरात खूपच फेमस झाली होती.  ॲनिमल या चित्रपटामध्ये  तिने रणबीर कपूर सोबत इंटीमेट सीन करून खूप पॉपुलॅरिटी मिळवली होती.  यानंतर तृप्ति कडे भरपूर चित्रपटांची लाईन लागली . या दरम्यान तृप्ति अभिनेता विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 'बॅड न्यूज' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. या दोन्ही कलाकारांना पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते, पण आता ती प्रतीक्षा संपली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात एमी विर्कही त्याच्यासोबत आहे.

विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांच्या 'बॅड न्यूज' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यामध्ये एमी विर्कसोबत विकीने कॉमेडीचा अप्रतिम तडका दिला आहे. विकीची अप्रतिम शैली आणि अभिनय चाहत्यांची मने जिंकत आहे. त्याचबरोबर तृप्तिने पुन्हा एकदा इंटिमेट सीन्स दिले आहेत. या अभिनेत्रीने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने आणि क्यूटनेसने प्रसिद्धी मिळवली आहे. त्याचवेळी, ट्रेलरमध्ये 90 च्या दशकातील लोकप्रिय गाणे ‘मेरे महबूब मेरे सनम’या गाण्याच्या नवीन व्हर्जनमध्ये पार्श्वसंगीताचा वापर करण्यात आला आहे, जो ऐकायला खूप आनंददायी आहे. करीना कपूर आणि अक्षय कुमारसोबत 'गुड न्यूज' बनवणारे दिग्दर्शक आनंद तिवारी यांनी 'बॅड न्यूज'चे दिग्दर्शन केले आहे. , ते  पुन्हा एकदा नवीन  मसाला घेऊन आले  आहेत . यावेळी संकल्पना आई आणि मूल एक पण वडील दोन अशी आहे. हे खूपच मनोरंजक आहे आणि चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त कॉमेडीचा तडका आहे. हा चित्रपट (19 जुलै) रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story