Baahubali 3 : बाहुबली ३?

प्रभासचे जगभर चाहते असून एस. एस. राजमौली यांच्या बाहुबली १ आणि २ या चित्रपटामुळे तो सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यानेच एका मुलाखतीत बाहुबलीच्या पीरियड ड्रामामुळे आपल्या कारकिर्दीला वेगळी दिशा मिळाल्याचे त्याने मान्य केले होते. जेथे जेथे आपण जातो तेथे आपणाला बाहुबलीचा कलाकार म्हणून ओळखतात असे त्याने मान्य केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 23 Apr 2023
  • 01:47 am
बाहुबली ३?

बाहुबली ३?

प्रभासचे जगभर चाहते असून एस. एस. राजमौली यांच्या बाहुबली १ आणि २ या चित्रपटामुळे तो सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यानेच एका मुलाखतीत बाहुबलीच्या पीरियड ड्रामामुळे आपल्या कारकिर्दीला वेगळी दिशा मिळाल्याचे त्याने मान्य केले होते. जेथे जेथे आपण जातो तेथे आपणाला बाहुबलीचा कलाकार म्हणून ओळखतात असे त्याने मान्य केले. ताज्या माहितीनुसार प्रभास बाहुबलीचे निर्माते शोबु यारलागड्डा आणि प्रसाद देवनेनी यांच्याशी एका आकर्षक प्रोजेक्टवर चर्चा करत असल्याचे समजते. त्यांची काही कथांवर चांगली चर्चा झाली असली तरी त्यातील एक कथा त्यांना आवडली असल्याचे कळते. अर्थात ही कथा बाहुबलीपेक्षा पूर्ण वेगळी असल्याचे सांगितले जाते. प्रभासने आतापर्यंत ज्या पद्धतीच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत त्यापेक्षा या चित्रपटातील व्यक्तिरेखा पूर्ण वेगळी असेल आणि या कथेचा पट हा जागतिक असेल. सध्या प्रभासच्या हातात असलेल्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण झाल्यावर नव्या चित्रपटाचा तपशील निश्चित केला जाईल. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. ओम राऊतचा आदिपुरुष, नाग अश्विनचा प्रोजेक्ट के आणि नील सालार-मारुती दासरीचा राजा डिलक्स हे प्रभासचे आगामी चित्रपट आहेत.         

यापूर्वी बाहुबलीचे निर्माते प्रसाद देवनेनी यांनी बाहुबली ३ ची शक्यता नाकारता येत नाही असे जाहीर केले होते. दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनीही अशा आशयाचे संकेत दिले होते. प्रसाद देवनेनी म्हणाले होते की, जर एस. एस. राजमौलींना बाहुबली ३ मधून आणखी एखादी कथा सांगण्याची शक्यता वाटत असेल तर तसे होऊ शकते. या चित्रपटातील व्यक्तिरेखा खूप मोठ्या आहेत. मात्र, प्रभासकडे काही चित्रपट असल्यामुळे ते पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही याबाबत घाई करणार नाही. प्रभास मोकळा झाला की आम्ही त्यावर विचार करू. जर सगळ्या गोष्टी जुळवून आल्या तर बाहुबली ३ शक्य आहे. मात्र, सध्या तरी आम्ही त्यावर विचार करत नाही, हे नक्की. मात्र, प्रभास आणि  शोबु यारलागड्डा-प्रसाद देवनेनी यांच्यात झालेली चर्चा ही बाहुबली ३ नव्हे तर एका वेगळ्या प्रकल्पाबाबत होती हे नक्की. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story