Anupam Kher : अनुपम खेर यांनी व्यक्त केली 'फिल्मफेअर'वर नाराजी

चित्रपट क्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ६८ व्या फिल्मफेअर पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारात ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘बधाई दो’ या दोन चित्रपटांचा बोलबाला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 30 Apr 2023
  • 06:32 pm

अनुपम खेर यांनी व्यक्त केली 'फिल्मफेअर'वर नाराजी

चित्रपट क्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ६८ व्या फिल्मफेअर पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारात ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘बधाई दो’ या दोन चित्रपटांचा बोलबाला होता.

राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या फिल्मफेअर पुरस्काराची मानकरी ठरली. गंगुबाई काठियावाडी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह १० पुरस्कार मिळाले, तर हर्षवर्धन कुलकर्णीच्या ‘बधाई दो’ने क्रिटिक्स अवॉर्ड कॅटेगरीमध्ये सर्वाधिक सहा पुरस्कार जिंकले. अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र: भाग-१ शिवा’ या चित्रपटालाही चार कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. परंतु, विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला यंदाच्या फिल्मफेअरमध्ये एकही पुरस्कार देण्यात आला नाही.

फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “इज्जत ही महागडी गोष्ट आहे. त्यामुळे ती देण्याची अपेक्षा छोट्या लोकांकडून ठेवू नये,” असे अनुपम खेर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. अनुमप खेर यांच्या या पोस्टचा संबंध फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याशी जोडला जात आहे.

दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार २०२३ मध्ये सात श्रेणीत नामांकन मिळाले होते. काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित नव्हते. एक दिवस आधीच त्यांनी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार नसल्याचे सांगितले होते. अग्निहोत्रींनी फिल्मफेअर पुरस्कार नैतिकदृष्ट्या स्वीकारण्यास योग्य नसल्याचे ट्वीटमध्ये म्हटले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story