दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 मध्ये अनिल कपूर यांनी ॲनिमल साठी "सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता" पुरस्कार पटकावला
एक वडील म्हणून अनिल कपूर यांची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आणि या चित्रपटा ने खूप यश कमावलं.बलबीर सिंगच्या भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.
या अभिनेत्याने दोन महिन्यांच्या कालावधीत सलग दोन सुपरहिट चित्रपट केले. ॲनिमल आणि फायटर मधून त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली. Animal ने 870Cr कमावले तर Fighter यशस्वीपणे चालू आहे आणि बॉक्स ऑफिसवर 350Cr पार केले आहे. कपूरच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांच्या कर्तृत्वाची इंडस्ट्रीची ओळख अधोरेखित केली आहे.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित एरियल ॲक्शन- थ्रिलर 'फाइटर' सह, 'ॲनिमल' हा वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक बनला असताना मेगास्टारने पुन्हा एकदा उत्तम अभिनय केला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.