केबीसीच्या टीझरमध्ये झळकली अनघा

छोट्या पडद्यावर अनघाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे अनघाला तिच्या करिअरमध्ये एक मोठी संधी मिळाली आहे. 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमाचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 2 Jul 2024
  • 02:38 pm
Entertainment news, Anagha Atul, KBC, rang maaza vegla

संग्रहित छायाचित्र

'रंग माझा वेगळा' मालिकेने सप्टेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने प्रत्येकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कार्तिक व दीपाच्या जोडीने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. या मालिकेत अभिनेत्री अनघा अतुलने (Anagha Atul) श्वेता हे खलनायिकेचे पात्र साकारले होते.

या मालिकेमुळे अनघा घराघरांत लोकप्रिय झाली. अभिनेत्री पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची लेक आहे. छोट्या पडद्यावर अनघाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे अनघाला तिच्या करिअरमध्ये एक मोठी संधी मिळाली आहे. 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमाचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'सोनी टीव्ही'वर हा शो प्रसारित केला जाणार आहे. या नव्या सीझनचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला अन् यामध्ये अभिनेत्री अनघा अतुलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. केबीसीच्या जाहिरातीमध्ये यंदा तिची वर्णी लागली आहे. यामुळे अनघाला थेट बॉलिवूडचे महानायक

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अनघाने तिच्या इन्स्टाग्रामवर 'कौन बनेगा करोडपती'च्या सीझनचा प्रोमो शेअर केला आहे. "माझे नवीन काम, पहिले काम नेहमीच खास असते. अमिताभ बच्चन सरांबरोबर पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. केबीसी जाहिरात" असे कॅप्शन अभिनेत्रीने हा प्रोमो शेअर करत लिहिले आहे.

अनघाच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. रेश्मा शिंदे, तितीक्षा तावडे, ऋतुजा बागवे, पूजा बिरारी, शिवानी सोनार या अनघाच्या जवळच्या मैत्रिणींनी या प्रोमोवर कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 'कौन बनेगा करोडपती'चा हा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, अनघाच्या कामाबद्दल सांगायचे झाले, तर तिने 'रंग माझा वेगळा', 'पिरतीचा वणवा उरी पेटला' यांसारख्या मालिकांमध्ये खलनायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्री बिझनेस वूमन देखील आहे. आपल्या भावाच्या साथीने गेल्या वर्षी तिने पुण्यात नवीन हॉटेल सुरू केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story