Amrita Khanwilkar : ‘महाराष्ट्र शाहीर’वर अमृता खानविलकरने उधळली स्तुतिसुमने

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दिग्दर्शक केदार शिंदेंचा ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. कृष्णराव गणपतराव साबळे ऊर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतेच अभिनेत्री अमृता खानविलकरने तिला हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल पोस्ट केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 3 May 2023
  • 04:30 pm
‘महाराष्ट्र शाहीर’वर अमृता खानविलकरने उधळली स्तुतिसुमने

‘महाराष्ट्र शाहीर’वर अमृता खानविलकरने उधळली स्तुतिसुमने

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दिग्दर्शक केदार शिंदेंचा ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. कृष्णराव गणपतराव साबळे ऊर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतेच अभिनेत्री अमृता खानविलकरने तिला हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल पोस्ट केली आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहिरांची भूमिका अंकुश चौधरीने साकारली आहे. तर, या चित्रपटात सना शिंदे ही शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारताना दिसत आहे. अमृता खानविलकरने नुकतेच या चित्रपटातील काही व्हीडीओ पोस्ट केले आहेत.

“आजच्या दिवशी जर आपल्या जन्मभूमीला, कर्मभूमीला तुम्हाला बहुमान द्यायचा असेल, तर फक्त महाराष्ट्र शाहीर अनुभवून बघा. प्रेक्षक म्हणून हा चित्रपट बघताना डोळे भरून येतात, अंगावर रोमांच उभे राहतात, उर अभिमानाने भरून येतो. उत्तम दिग्दर्शन, छायाचित्रण, अभिनयाने नटलेला हा चित्रपट तुम्ही बघायलाच पाहिजे. केदार शिंदे अप्रतिम स्टोरी टेलिंग आणि दिग्दर्शन अंकुश चौधरी कुठेच दिसत नाही फक्त आणि फक्त शाहीर साबळे. सना शिंदेचे डोळे… तिची सरलता… तिची स्थिरता खूपच जीवघेणी आहे आणि अजय-अतुल ह्यांच्या संगीताबद्दल जितकं बोलावं तितकं कमी. गाऊ नको किसना म्हणजे कमाल. पाऊल थकलं नाही. अजय सर काय बोलावं? नतमस्तक! चित्रपट नक्की बघा, जय जय महाराष्ट्र माझा!" असे अमृता खानविलकरने म्हटले आहे.

दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात सना शिंदे, अभिनेत्री अश्विनी महांगडे, निर्मिती सावंत यांसह अनेक कलाकार हे महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story