ऐश्वर्या-आराध्या परतल्या

मणिरत्नमच्या आगामी पोन्निएन सेल्व्हन २ मध्ये ऐश्वर्या रायची महत्त्वाची भूमिका असून त्याच्या प्रमोशन कामात ती सध्या व्यग्र आहे. हैदराबादमधील पोन्निएन सेल्व्हन २ च्या प्रमोशननंतर ऐश्वर्या रविवारी रात्री मुंबईत परतली. यावेळी तिच्यासमवेत कन्या आराध्या ही देखील होती. या माय-लेकी हातात हात घालून विमानतळावरून बाहेर पडत होत्या. यावेळी विमानतळावरून कारकडे जाताना ऐश्वर्याने आराध्याचा हात अगदी घट्ट धरला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 25 Apr 2023
  • 06:28 am

ऐश्वर्या-आराध्या परतल्या

मणिरत्नमच्या आगामी पोन्निएन सेल्व्हन २ मध्ये ऐश्वर्या रायची महत्त्वाची भूमिका असून त्याच्या  प्रमोशन कामात ती सध्या व्यग्र आहे. हैदराबादमधील पोन्निएन सेल्व्हन २ च्या प्रमोशननंतर ऐश्वर्या रविवारी रात्री मुंबईत परतली. यावेळी तिच्यासमवेत कन्या आराध्या ही देखील होती. या माय-लेकी हातात हात घालून विमानतळावरून बाहेर पडत होत्या. यावेळी विमानतळावरून कारकडे जाताना ऐश्वर्याने आराध्याचा हात अगदी घट्ट धरला होता. 

ऐश्वर्या राय आणि आराध्या हैदराबादहून मुंबई विमानतळावर दाखल झाल्याची कल्पना तेथे उपस्थित असलेल्या पापाराझ्झींना क्षणात आली. आराध्याचा हात धरूनच ऐश्वर्याने हसत हसत पापाराझ्झींना हात केला आणि ती कारकडे निघाली. आपल्या आईबरोबर गेटमधून बाहेर पडताना आराध्याही पापाराझ्झींकडे पाहून हसली. ऐश्वर्याने ढगळसा काळ्या रंगाचा हूडेड झिपर आणि त्याच रंगाची लेगिंज घातलेली होता. डार्क ब्राऊन बॅग आणि व्हाईट स्निकरमध्ये ऐश्वर्या सहजपणे वावरताना दिसत होती. आराध्याने गुलाबी रंगाचा स्वेटशर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम जीन घातलेली होती. व्हायरल झालेल्या फोटोवर एक नेटिझन म्हणतो की, जेव्हा त्यांनी मुंबई सोडली तेव्हा त्यांनी एका रंगाचे कपडे घातले होते ना ? याला उत्तर देताना दुसरा नेटिझन म्हणतो की, हो, त्यांनी एका रंगाचे कपडे घातल्याचे माझ्याही चांगले लक्षात आहे. आणखी एकजण इन्स्टाग्रामवर म्हणतो की, आराध्या साधी आणि सरळ मुलगी आहे. ती आयुष्यभर अशीच राहावी आणि त्यात काही बदल होऊ नये असे मला वाटते.

हैदराबादमधील पोन्निएन सेल्व्हन २ च्या प्रमोशनसाठी ऐश्वर्या, आराध्या, विक्रम, कार्थी, जयाम रवी रविवारी विमानतळावर आल्याचे दिसले होते. पोन्निएन सेल्व्हन १ मधील सर्व कलाकार दुसऱ्या भागात असून ऐश्वर्याची यात दुहेरी भूमिका आहे. या चित्रपटात ती नंदिनी आणि ओमाई राणी या दोन भूमिका साकारत आहे. पोन्निएन सेल्व्हन २ शुक्रवारी म्हणजे २८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.          

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story