पुन्हा दीपिका, बिकिनी अन् वाद
हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) या स्टार्सच्या आगामी ‘फायटर’ (fighter) या चित्रपटाबाबत सर्वत्र उत्सुकता आहे. हा भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट असेल. या प्रकारासोबतच ‘फायटर’च्या निमित्ताने दीपिका, बिकिनी (Bikini) अन् वाद हे समीकरण जुळून आल्याने सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. (Deepika Bikini)
‘फायटर’चा टीझर नुकताच रिलीज झाला. यामध्ये अनेक एरियल अॅक्शन सीन आहेत, पण ते सोडून बिकिनीचा एक प्रकार असलेल्या मोनोकिनीचीच चर्चा सुरू आहे. एका सीनमध्ये दीपिकाने मोमोकिनी परिधान केली आहे. आतापर्यंत या सीनसाठी दीपिकाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते, मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. अशी कृती करून ‘‘दीपिकाने फायटर पायलटचा अपमान केला आहे,’’ असे अनेक यूझर्सचे म्हणणे आहे.
या चित्रपटात दीपिकाचे किसिंग आणि बिकिनी सीन्स आहेत. यावर अनेक यूजर्सनी आक्षेप घेतला आहे. दीपिका या चित्रपटातून महिला फायटर पायलटचा अपमान करत असल्याची टिप्पणी काहींनी केली आहे. एक यूझर म्हणतो, ‘‘प्रत्येक देशाची स्वतःची संस्कृती असते. आमच्या शूर भारतीय हवाई दलाच्या महिला लढाऊ वैमानिकांच्या अशा चित्रणाचे कोणीही कौतुक करणार नाही. या चित्रपटाचा टीझर महिला फायटर पायलटचा अपमान करत आहे. दीपिकासोबतच हृतिकलाही लाज वाटली पाहिजे.’’
‘‘मला आशा आहे की तुमच्यामध्ये थोडी लाज उरली असेल. प्रत्येक चित्रपटात तुम्ही कलाकार म्हणून आणि स्त्री म्हणून खाली पडत आहात. मला तुमच्या कपड्यांबद्दल काही अडचण नाही पण किमान आयएएफ महिला सैनिकांची बदनामी करू नका. तू चीप आहेस, ते नाहीत,’’ अशा कठोर शब्दांत एका यूझरने दीपिकाला खडसावले आहे.
यापूर्वी ‘पठाण’ चित्रपटात दीपिकाने केशरी रंगाची बिकिनी घातल्याने बराच वाद झाला होता. दीपिका ‘फायटर’मध्ये स्क्वाड्रन लीडर मीनल राठोडची भूमिका साकारत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. यात हृतिक आणि दीपिकाशिवाय अनिल कपूर, करणसिंग ग्रोव्हर, संजीदा शेख आणि अक्षय ओबेरॉय हेदेखील दिसणार आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.