सासरी पोहोचल्यानंतर सोनाक्षी भावूक

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल रविवारी (दि. २३) विवाहबद्ध झाले. या जोडप्याने दुपारी नोंदणीकृत विवाह केला आणि मुंबईतील दादर येथील शिल्पा शेट्टीच्या बॅस्टियन रेस्तरॉंमध्ये रात्री उशिरा रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 25 Jun 2024
  • 03:10 pm
Entertainment news, Sonakshi Sinha

संग्रहित छायाचित्र

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) रविवारी (दि. २३) विवाहबद्ध झाले. या जोडप्याने दुपारी नोंदणीकृत विवाह केला आणि मुंबईतील दादर येथील शिल्पा शेट्टीच्या बॅस्टियन रेस्तरॉंमध्ये रात्री उशिरा रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते.

या पार्टीचे अनेक आतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. येथे या जोडप्याने केक कापून आनंद साजरा केला. दोघांनीही 'दबंग'मधील 'तेरे मस्त मस्त दो नैन..' या गाण्यावर रोमँटिक डान्स केला.

रॅपर हनीसिंगने सोनाक्षीसाठी परफॉर्म केले त्याची बेस्ट फ्रेंड सोनाक्षीच्या रिसेप्शन पार्टीला आलेल्या हनीसिंगने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. डीजे पार्टीदरम्यान हनीने टेबलवर उभे राहून एक गाणे गायले, ज्यावर सोनाक्षी आणि झहीर नाचताना दिसले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या पार्टीत सोनाक्षी आणि झहीरने अनेक गाण्यांवर डान्स केला.

याशिवाय सोनाक्षीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती इमोशनल दिसत होती. या व्हिडिओमध्ये झहीरची खास मैत्रीण जन्नत वासी सोनाक्षीचे स्वागत करते आणि तिला फुलांचा हार घालते. यानंतर अभिनेत्री झहीर आणि सोनाक्षीला मिठी मारताना भावूक झाली. यादरम्यान सोनाक्षीच्या डोळ्यातील अश्रू पुसताना दिसली.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना जन्नतने लिहिले, ‘‘माझ्या भावाचे लग्न झाले आहे. पा आणि सोनाचे खूप खूप अभिनंदन. तुम्हा दोघांसाठी खूप आनंद झाला.’’

या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आले होते. तत्पूर्वी, रविवारी रात्री रिसेप्शन पार्टीमध्ये सोनाक्षी लाल रंगाच्या साडीत सिंदूर परिधान करून आली होती, तर झहीर ऑफ व्हाइट ड्रेसमध्ये दिसला होता. या जोडप्याचे अभिनंदन करण्यासाठी सलमान खान, अनिल कपूर, रेखा आणि काजोलसह अनेक बडे सेलिब्रिटी पार्टीमध्ये आले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story