संग्रहित छायाचित्र
अभिनेत्री पूजा हेगडेला (Pooja Hegde) जीवे मारण्याची धमकी (threat) मिळाल्याने बॉलिवूडला धक्का बसला आहे. प्रसिद्ध पापाराझी आणि सोशल मीडिया स्टार विरल भयानीने सोशल मीडियावरून दिलेल्या माहितीनुसार सांगितल्यानुसार, दुबईमध्ये एका क्लबमध्ये झालेल्या जोरदार वादानंतर पूजाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.
विरल भयानीने दिलेल्या वृत्तानुसार, पूजा दुबईला क्लबच्या उद्घाटनासाठी गेली होती. पण तिथे तिचा जोरदार वाद झाला. हा वाद नेमका कशावरुन झाला हे मात्र अद्याप कळू शकलं नाही. ही बातमी ऐकताच पूजाच्या चाहते काळजीत पडले आहेत. भारतात परतल्यावर पूजाने मात्र तिला अशी कोणतीही धमकी मिळाल्याचा इन्कार केल्याचे कळते. पण तिने व्यावतिरिक्त धमकी प्रकरणावर बोलायचे टाळले. त्यामुळे या प्रकरणावरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कामाबद्दल बोलायचे झाल्यास पूजा शेवटची 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत दिसली होती. या वर्षी एप्रिलमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पूजा आता आगामी ‘देवा’ सिनेमात दिसणार आहे. शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असेलेला हा चित्रपट पुढील वर्षी ११ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. याचबरोबर मल्टीस्टारर ‘हाऊसफुल ५’मध्ये पूजा मस्ती करताना दिसणार आहे. यात अक्षयकुमार, रितेश देशमुख, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, बॉबी देओल, क्रिती सॅनन, क्रिती खरबंदा, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी आणि चंकी पांडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.