अभिनेत्री जान्हवी कपूर- साऊथचा सुपरस्टार सूर्या एकत्र
बाॅलिवूडमधील (Bollywood) हाॅट अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सातत्याने मोठ्या चित्रपटांचा भाग बनत आहे. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि ‘देवरा’नंतर आता जान्हवीने साऊथचा ‘कर्ण’ हा चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत साऊथचा सुपरस्टार सूर्या (Surya) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
राकेश ओमप्रकाश मेहरा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. हा चित्रपट पौराणिक कथा महाभारतातील कर्ण या पात्राची कथा असणार आहे, ज्यामध्ये साऊथचा सुपरस्टार सूर्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कर्ण हा चित्रपट भारतातील पाच भाषांमध्ये बनवला जाईल. हा एक बिग बजेट चित्रपट असणार आहे, ज्याच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू झाले आहे.
‘बवाल’ हा जान्हवीचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट होता, ज्यामध्ये ती वरुण धवनसोबत दिसली होती. हा चित्रपट ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला होता. आता ती एकाच वेळी चार मोठ्या चित्रपटांचा भाग आहे. जान्हवी या वर्षी ज्युनियर एनटीआरसोबत ‘देवरा’ या चित्रपटातून तेलुगू चित्रपट इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय ती ‘उलझ,’ ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि ‘कर्ण’ या चित्रपटात दिसणार आहे. हे चारही चित्रपट यंदा प्रदर्शित होणार आहेत.
राकेश ओमप्रकाश मेहराबद्दल बोलायचे झाले तर तो ‘रंग दे बसंती,’ ‘दिल्ली,६’ ‘भाग मिल्खा भाग’ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखला जातो. २०२१ मध्ये आलेला ‘तुफान’ हा त्याने दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट होता. यामध्ये फरहान अख्तर, मृणाल ठाकूर आणि परेश रावल मुख्य भूमिकेत होते. ‘कर्ण’च्या माध्यमातून तो तीन वर्षांनी पुनरागमन करणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.