अभिनेता सैफ अली खान रुग्णालयात दाखल
मुंबई : बॉलीवूडचा अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) बाबत मोठी बामती समोर आली आहे. सूत्राच्या माहितीनुसार सैफ अली खान यास मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैफला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर येताच धक्का बसला आहे. सैफ हा त्याच्या एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असताना त्याला त्या चित्रपटाच्या सेटवर अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सैफला फ्रॅक्चर झाले आहे. अभिनेत्याच्या गुडघ्याला अन् खांद्याला मोठी दुखापत झाली आहे. सैफच्या गुडघ्याला नेमक्या कोणत्या कारणामुळे दुखापत झाली याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, सैफच्या प्रकृतीबाबत अधिकृत अपडेटची प्रतीक्षा आहे. सैफच्या सोबत त्याची पत्नी करिना कपूर रुग्णालयात आहे.
अभिनेता सैफ ज्युनियर एनटीआर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्यासोबत पॅन-इंडिया चित्रपट 'देवरा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झाला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.