ॲक्शनपॅक्ड 'रौंदळ'ची प्रतीक्षा संपली

पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा 'रौंदळ' हा चित्रपट आता ३ मार्चला महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 'रौंदळ'चे वेगळेपण म्हणजे, चित्रपटातील भाऊसाहेब शिंदेचा रावडी लुक... राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'ख्वाडा' आणि म्युझिकल लव्हस्टोरी 'बबन' चित्रपटानंतर 'रौंदळ'मध्ये पुन्हा डॅशिंग भाऊसाहेब दिसणार आहे. त्याच्या जोडीला नेहा सोनावणे ही नवोदित अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर ट्रेलर आणि गीत-संगीताला मिळालेला रसिकांचा प्रतिसाद पाहता 'रौंदळ' धमाका उडवेल असे दिसते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 28 Feb 2023
  • 07:38 am
ॲक्शनपॅक्ड 'रौंदळ'ची प्रतीक्षा संपली

ॲक्शनपॅक्ड 'रौंदळ'ची प्रतीक्षा संपली

पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा 'रौंदळ' हा चित्रपट आता ३ मार्चला महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 'रौंदळ'चे वेगळेपण म्हणजे, चित्रपटातील भाऊसाहेब शिंदेचा रावडी लुक... राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'ख्वाडा' आणि म्युझिकल लव्हस्टोरी 'बबन' चित्रपटानंतर 'रौंदळ'मध्ये पुन्हा डॅशिंग भाऊसाहेब दिसणार आहे. त्याच्या जोडीला नेहा सोनावणे ही नवोदित अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर ट्रेलर आणि गीत-संगीताला मिळालेला रसिकांचा प्रतिसाद पाहता 'रौंदळ' धमाका उडवेल असे दिसते.  

'रौंदळ'ची निर्मिती भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट या संस्थेअंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी, भाऊ शिंदे आणि राईज बिझनेस ग्रुप यांनी केली आहे. गजानन नाना पडोळ यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. टप्प्याटप्प्यानं वाढणारी उत्सुकता शिगेला पोहोचवण्याचं काम 'रौंदळ'च्या ट्रेलरनं केल्यानंतर आता संपूर्ण चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील 'मन बहरलं...', 'भलरी...' आणि 'ढगानं आभाळ...' ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. हर्षित अभिराज, डॅा. विनायक पवार, बाळासाहेब शिंदे आणि सुधाकर शर्मा यांनी लिहिलेल्या गीतांना सोनू निगम, जावेद अली, स्वरूप खान, दिव्य कुमार, वैशाली माडे, हर्षित अभिराज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरसाज चढवला आहे. 

'रौंदळ'मध्ये संजय लाकडे, यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, गणेश देशमुख, सागर लोखंडे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. डीओपी अनिकेत खंडागळे यांनी सिनेमॅटोग्राफी, तर फैझल महाडिक यांनी संकलन केलं आहे. महावीर साबन्नावरनं सिंक साऊंड आणि डिझाईन केलं आहे. मोझेस फर्नांडिस या चित्रपटाचे फाईट मास्टर असून, गजानन सोनटक्के कला दिग्दर्शक आहेत. 

कोरिओग्राफी नेहा मिरजकर यांनी केली असून, रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. या सिनेमाचे असोसिएट दिग्दर्शक विक्रमसेन चव्हाण आहेत, तर कार्यकारी निर्माते मंगेश भीमराज जोंधळे आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story