Dawood : दाऊदसोबतच्या एका फोटोमुळे लागली ‘ति’च्या करिअरची वाट...

भारताचा शत्रू, कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) पाकिस्तानात (pakistan) विषप्रयोग करण्यात आला असून यात त्याचे निधन झाल्याची चर्चा जोरात आहे. या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Dawood Ibrahim

दाऊदसोबतच्या एका फोटोमुळे लागली ‘ति’च्या करिअरची वाट...

भारताचा शत्रू, कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) पाकिस्तानात (pakistan)  विषप्रयोग करण्यात आला असून यात त्याचे निधन झाल्याची चर्चा जोरात आहे. या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, या वृत्ताच्या निमित्ताने दाऊदच्या कारनाम्यांना उजाळा मिळत आहे. बाॅलिवूडमध्ये दाऊदचे खोलवर सबंध होते. त्याच्यासोबतच्या एका फोटोमुळे तर वेगाने पुढे येत असलेल्या सौंदर्यवती अभिनेत्रीच्या करिअरची पूर्णपणे वाट लागली. ती अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी.

बाॅलिवूडमध्ये दाऊद आणि त्याचे सहकारी मोठ्या प्रमाणावर सक्रीय होते. त्यांना ‘डी गॅंग’ म्हणून ओळखले जायचे.  दाऊदचा दबदबा फक्त गुन्हेगारी विश्वापुरता मर्यादित नव्हता, बॉलिवूडमध्येही त्याची दहशत होती. बॉलिवूडचे स्टार्स, निर्मात्यांकडून दाऊद पैसे उकळायचा. पुढे जाऊन दाऊदने काही चित्रपटांना फायनान्स केला. बॉलिवूडमध्ये दाऊदची दहशत इतकी होती की, निर्माते त्याच्या मर्जीने हिरो-हिरॉइन्सना चित्रपटात घ्यायचे. बॉलिवूडचे अनेक कलाकार दाऊदच्या पार्ट्यांना हजेरी लावायचे. त्याचे व्हीडीओ आजही उपलब्ध आहेत.  दाऊदचं नाव बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रींसोबत जोडल गेलं. त्याच्या प्रेमकथांची चर्चा मीडियामध्ये रंगली. काही अभिनेत्रींनी दाऊदसोबत नाव जोडलं जाण्याचा अजिबात संकोच बाळगला नाही. त्या सार्वजनिक ठिकाणी दाऊदसोबत उपस्थित राहिल्या. त्याची मोठी किंमत या अभिनेत्रींना चुकवावी लागली. त्यात मंदाकिनीचाही समावेश होतो.

प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांच्यामुळे बॉलिवूडला मंदाकिनीच्या (Mandakini) रुपात एक सौंदर्यवान अभिनेत्री मिळाली. ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटातून मंदाकिनीला राज कूपर यांनी लॉन्च केलं. मंदाकिनीच्या सौंदर्याने अनेकांना भुरळ पाडली. मंदाकिनी दिसायला खूपच मोहक होती. १९८५मध्ये आलेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटामुळे मंदाकिनी रातोरात स्टार बनली.  

मंदाकिनीच्या सौंदर्याची जादू अशी होती की, त्यावेळी प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाला तिला आपल्या चित्रपटात घ्यायच होतं. मंदाकिनी नावाची एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आल्याची, तिच्या सौंदर्याची चर्चा साहजिकच दाऊदपर्यंत पोहोचली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसुद्धा मंदाकिनीवर भाळला. हळूहळू त्याने मंदाकिनीबरोबर संपर्क वाढवला. मीडियामध्ये दोघांच्या प्रेमसंबंधांची चर्चा सुरु झाली. मंदाकिनीनेही प्रारंभी ही चर्चा होऊ दिली. मात्र, दाऊदबरोबर नाव जोडल गेल्याने मंदाकिनीला फायद्यापेक्षा तोटा जास्त झाला.  

मंदाकिनी आणि दाऊदच्या प्रेमसंबंधांची चर्चा १९९४ मध्ये सुरु झाली. त्यावेळी मंदाकिनीचा दाऊदसोबतचा दुबईच्या क्रिकेट स्टेडियममधील एक फोटो समोर आला. या फोटोने एकच खळबळ उडवून दिली. हा फोटो समोर येण्याच्या एक वर्ष आधीच मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. दाऊद या प्रकरणात मुख्य आरोपी होता. या फोटोमुळे मंदाकिनीबद्दलच अनेकांचं मत बदललं. मंदाकिनी दाऊदच्या जवळ असल्याचं सर्वत्र बोललं जाऊ लागलं. दाऊदला मंदाकिनी इतकी आवडायची की, तिला चित्रपट मिळवून देण्यासाठी तो निर्मात्यांना धमकी द्यायचा. हा फोटो प्रसिद्ध झाल्यावर हळूहळू मंदाकिनीला चित्रपट मिळण बंद झालं. परिणामी १९९६मध्ये तिने चित्रपट सृष्टीला रामराम केला.

अनिता अयुबसोबतही होते अफेअर (Anita Ayub)

 एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडमध्ये दाऊदची प्रचंड दहशत होती.  बॉलिवूडमधल्या काही अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं होतं.  यामध्ये मूळची पाकिस्तानी तसेच बाॅलिवूडमध्ये नशीब अजमावलेली अभिनेत्री अनिता अयुब हिचाही समावेश होता. या दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. असं म्हटलं जातं की प्रसिद्ध चित्रपट निर्माते जावेद सिद्दिकी यांनी अनिताला त्यांच्या चित्रपटात घेण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर दाऊदने जावेद यांची हत्येची सुपारी दिली.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story