Marathi Natya Parishad : अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी दामले

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिलमध्ये पार पडली. त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती २०२३-२०२८ ची निवडणूक मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी (प्रशासन) नरेश गडेकर यांची, उपाध्यक्षपदी (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली, तर कोषाध्यक्षपदी सतीश लोटके यांची निवड झाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 17 May 2023
  • 11:47 am
अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी दामले

अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी दामले

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिलमध्ये पार पडली. त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती २०२३-२०२८ ची निवडणूक मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी (प्रशासन) नरेश गडेकर यांची, उपाध्यक्षपदी (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली, तर कोषाध्यक्षपदी सतीश लोटके यांची निवड झाली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कार्यवाहपदी अजित भुरे यांची निवड झाली असून सहकार्यवाहपदी समीर इंदुलकर, दिलीप कोरके आणि सुनील ढगे यांची निवड झाली आहे. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ गटाने दणदणीत विजय मिळवला होता, त्याशिवाय कार्यकारी समिती सदस्यांमध्येही ‘रंगकर्मी नाटक समुहातील’ ११ जणांची निवड झाली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा समावेश आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story