भाषण सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांना आली भोवळ, व्यासपीठावरच खाली बसले

मनोज जरांगे पाटील यांना भर सभेत भोवळ आली. साताऱ्यात एका सभेत भाषण देत असताना जरांगे पाटलांची तब्येत अचानक खालावली. भाषण करता करता जरांगे पाटील अचानक खाली बसले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 10 Aug 2024
  • 05:42 pm

भाषण सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांना आली भोवळ, व्यासपीठावरच खाली बसले

मनोज जरांगे पाटील यांना भर सभेत भोवळ आली. साताऱ्यात एका सभेत भाषण देत असताना जरांगे पाटलांची तब्येत अचानक खालावली. भाषण करता करता जरांगे पाटील अचानक खाली बसले. भरसभेत त्यांना अचानक भोवळ आली. आणि व्यासपीठावरच ते खाली बसले.  

दरम्यान, जरांगे पाटील हे कमरेला पट्टा लावून भाषण करत होते. भाषण करताना भोवळ आल्याने अचानक ते खाली बसले. यावेळी जरांगे पाटील व्यासपीठावर खाली बसलेले असताना त्यांच्या हाताचा थरकाप होताना दिसला. यावेळी कार्यकर्त्यांनी जरांगे पाटलांना सांभाळले.  

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम  महाराष्ट्र दौरा सुरू आहे.  पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली देखील होणार आहे. ६ ऑगस्टला मनोज जरांगे तुळजापुरात मुक्कामी होते. त्यानंतर ते सोलापूरात दाखल झाले. जरांगे पाटील शांतता रॅलीचे सोलापूरात जंगी स्वागत झाले. यावेळी ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांना एकत्रित करणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest