CIVIC MIRROR IMPACT:! डॅा.पूजा खेडकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा यूपीएससीचा निर्णय

वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी डॅा.पूजा खेडकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय यूपीएससीने घेतला आहे. डॅा.पूजा खेडकर यांचं आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस यूपीएससी देतेय

Dr. Pooja Khedkar

सीविक मिरर इम्पॉक्ट! डॅा.पूजा खेडकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा यूपीएससीचा निर्णय

पुणे : वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी डॅा.पूजा खेडकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय यूपीएससीने घेतला आहे. डॅा.पूजा खेडकर यांचं आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस यूपीएससी देतेय, अशी माहिती यूपीएससीने प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे. (Dr. Pooja Khedkar)

 डॉ. पूजा खेडकर यांनी प्रबोशनमध्ये असताना विशेष अधिकारांची मागणी त्यांनी केली. लाल दिव्याची गाडी, व्हीआयपी नंबर प्लेट, खासगी ऑडी कारवर यामुळे त्या चर्चेत आल्या.  पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांकडे 110 एकर जमीन, 7 फ्लॅट्स, 1 लाख स्केअर फुटाची 6 दुकाने आहेत. स्वत: पूजा खेडकर यांच्याकडे 17 कोटींची संपत्ती आहे. तर पूजाचे वडिलांनी निवडणूक शपथपत्रात 40 कोटींची संपत्ती दाखवली होती. तरीही त्यांनी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र देऊन परीक्षा दिली होती. त्याचबरोबर त्यांचे अपंगत्व प्रमाणपत्रही वादात सापडले होते. त्यांनी तीन ठिकाणी अर्ज केला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest