ट्रॅव्हल्स-ट्रकचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, बावीस जखमी

एका भरधाव ट्रॅव्हल्स बसने उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली. या अपघातात चार प्रवासी घटनास्थळीच ठार झाले तर 22 प्रवासी गंभीर गंभीर जखमी झाले. हा अपघात उमरेड-भिवापूर राष्ट्रीयमार्गावरील तास शिवारात (नागपूर) गुरुवारी (दि.५) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 5 Sep 2024
  • 08:14 pm

ट्रॅव्हल्स-ट्रकचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, बावीस जखमी

एका भरधाव ट्रॅव्हल्स बसने उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली. या अपघातात चार प्रवासी घटनास्थळीच ठार झाले तर 22 प्रवासी गंभीर गंभीर जखमी झाले. हा अपघात उमरेड-भिवापूर राष्ट्रीयमार्गावरील तास शिवारात (नागपूर) गुरुवारी (दि.५) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास झाला.  जखमी प्रवाशांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, माँ दुर्गा नामक ट्रॅव्हल्स बस प्रवाशांना घेऊन नागपूर येथून भिवापूरकडे भरधाव येत होती. टर तास शिवारातील बसथांबा परिसरात असलेल्या पान टपरीशेजारी रेशनचे धान्य भरलेला ट्रक (क्र. एम.एच. ३१ ए.पी. २९६६) थांबलेला होता. भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स उभ्या ट्रकसह पानटपरीला धडक देत थेट शेतात शिरली. यात ट्रॅव्हल्समधील एक महिला, एक मुलगा व दोन पुरुष असे चौघे थेट ट्रॅव्हल्सच्या खाली आलेत. यातील दोघांच्या शरीरावर, तर अक्षरश: ट्रॅव्हल्सचे चाक होते. 

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले. तर दोन जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅव्हल्सखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. दहापेक्षा जास्त लोक गंभीर जखमी होते त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले. या भयावह अपघातात ट्रॅव्हल्स बसच्या समोरच्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला. तसेच समोरची दोन्ही चाके देखील निखळली. 

दरम्यान, मृतांमध्ये भिवापूर व उमरेड येथील प्रत्येकी एक तर  तर कन्हाळगाव ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथील एकाचा समावेश आहे. अन्य एकाची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest