राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे पोलीस दलात सहपोलीस आयुक्तपदी रंजनकुमार शर्मा

पुणे : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश गृहविभागाने सोमवारी सायंकाळी दिली. पुण्याचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती.

संग्रहित छायाचित्र

पुणे : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश गृहविभागाने सोमवारी सायंकाळी दिली. पुण्याचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. रिक्त असलेल्या सहपोलीस आयुक्तपदी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले. 

कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांची बदली करण्यात आली असून, गुप्ता यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक, मुंबई, विशेष कृती दलात नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान विभाग, परिवहन विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक, मुंबई, नियोजन, समन्वय विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष कृती दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांची लोहमार्ग पोलीस दलात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक सुरेशकुमार मेखला यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक, वाहतूक विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. 

महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक दीपक पांडे यांची पोलीस दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांची महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूरचे सहपोलीस आयुक्त अश्विती दोरजे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक नागरी हक्क संरक्षण विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक  छेरिंग दोरजे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा आणि सुव्यवस्था विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ-पाटील यांची नागपूर परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest