... तर तुम्हालाही अवघड जाईल! मनोज जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

प्रकाश आंबेडकर आणि आम्ही सत्तेत नाही, मग आमच्यात कशाला भांडण लावता? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यात भांडण लावू नका, तुम्ही तसा प्रयत्न केलात तर तुम्हाला हे प्रकरण अवघड जाईल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 29 Jul 2024
  • 10:39 am
Maharastra News, manoj jarange patil, eknath shinde, prakash ambedkar, maratha reservation, maratha vs obc, warned difficult matter

संग्रहित छायाचित्र

शिंदेंना आरक्षणाचा गुंता वाढवायचा असल्याचाही केला आरोप

अंतरवाली सराटी: प्रकाश आंबेडकर आणि आम्ही सत्तेत नाही, मग आमच्यात कशाला भांडण लावता? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यात भांडण लावू नका, तुम्ही तसा प्रयत्न केलात तर तुम्हाला हे प्रकरण अवघड जाईल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकर व मनोज जरांगे पाटील यांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यावर आज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. आमच्या आमच्यात (मराठा समाज व प्रकाश आंबेडकर) गुंता निर्माण करू नका, असे जरांगे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, माझे सर्वांना आवाहन आहे की, आरक्षणप्रश्नी सर्वांनी एकत्र बसून चर्चा करावी. तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या मांडाव्यात. मराठा आणि इतर समाजाच्या मागण्यांवर आपल्या सरकारने मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. मनोज जरांगे असतील किंवा ओबीसी नेते असतील, या सर्वांनी एकत्र बसून चर्चा करावी. विविध समाजाच्या आरक्षणाबाबतच्या मागण्यांवर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून मार्ग काढला पाहिजे. मराठा आरक्षणाबाबत आमची पहिल्या दिवसापासून जी भूमिका होती तीच आजही कायम आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणे, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे कोणीही कोणावरही आरोप अथवा टीका करू नये.

तुमचेही आमदार घरी पाठवू !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आम्हाला आणि प्रकाश आंबेडकरांना एकत्र बसून चर्चा करायला सांगताहेत. तुम्हाला गुंता सोडवायाचा आहे वाढवायचा आहे हे कळत नाही. बरे ना आम्ही सत्तेत आहोत, ना प्रकाश आंबेडकर सत्तेत आहेत. त्यामुळे आम्ही आमच्यात चर्चा करून काय होणार आहे? उलट तुम्ही आमच्यातला गुंता वाढवत आहात. बहुदा तुमच्या आमदारांना मुंबईतून हाकलून देण्याची वेळ आली आहे. समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. तसेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही या भूमिकेवर सरकार आल्याशिवाय हा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, हे त्यांनी (सरकार) आता समजून घ्यावे. तसेच या लोकांनी विनाकारण आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. तसा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम वेगळ्या दिशेने जातील.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest