नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (मंगळवारी) घेण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 13 Aug 2024
  • 01:53 pm
Eknath Shinde

संग्रहित छायाचित्र

नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (मंगळवारी) घेण्यात आला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीला  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार याच्यासोबतच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीत झालेले काही महत्त्वाचे निर्णय :

- नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष करण्यात आला आहे

- विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार असून त्यासाठी १४९ कोटीस मान्यता देण्यात आली. 

- मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे लाखो नागरिकांना लाभ होणार आहे. 

- पुण्यातील डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र  विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना 

- यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथील 

 - शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन

- सहा हजार कि.मी. रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. 

- सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest