संग्रहित
जगासह देशात एचएमपीव्ही व्हायरसने धुमाकूळ घातला आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या बुलढाण्यात पुरषांसह महिलांनाही टक्कल पडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. केस गळती होत तीन दिवसात टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा नवा कोणता व्हायरस आहे असं प्रश्ना अनेकांना उपस्थित होऊ लागले. दरम्यान, याप्रकरणाचा उलगडा झाला असून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात मिसळला गेला आहे. तसेच, पाण्याची टीडीएस लेव्हलही वाढली असल्याचे पाण्याच्या तपासणीमध्ये उघड झाले.
शेगाव तालुक्यात टक्कल पडणाऱ्यांची संख्या 51 वर पोहचली आहे. तीनच दिवसात टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली. प्रशासनाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या. तक्रारीनंतर गंभीर दखल घेत आरोग्य विभागकडून शेगाव तालुक्यातील घरोघरी सर्वेक्षण सुरु केलं. फंगल इन्फेक्शनचा हा प्रकार असल्याचे मत तज्ज्ञांनी प्रथमदर्शनी व्यक्त केलं असून हा आजार पाण्यामुळे होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. गावातील पाणी, स्कीनचे नमुने घेण्यात आले असून ते नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभगाना दिलीय. अहवाल आल्यावर केस गळण्याचे नेमके कारण समोर येणार आहे.