Buldhana : बुलढाण्यात टक्काल व्हायरसचा धुमाकूळ ! टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात तीन गावांमध्ये जवळपास ५० हून अधिक व्यक्तींना अचानक केसगळती होत असून काही दिवसातच त्यांचे चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. हा आजार नेमका कोणता आहे, याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात आजारने थैमान घातले असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला डोके खाजवणे, नंतर सरळ केस हातात येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात असून ग्रामस्थ वापरात असलेल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पाण्याचा अहवाल आल्यावरच याचे कारण समोर येईल.