धनंजय मुंडे हे जातीय वादाच्या दिशेने जात असून त्यांनी माणुसकीची हत्या करू नये असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी पैठण येथे आयोजित मोर्च्यात केला. आम्ही जातीयवाद कधीही केला नाही. मात्र आपल्यावर आले म्हणून मुंडे यांनी ओबीसी च्या नावाचा वापर करू नये असा सल्ला जरांगे पाटील यांनी मुडेंना दिला.
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. त्यासाठी त्यांच्या मुलीच्या न्यायासाठी एकत्र यावे. धनंजय मुंडे हे आपल्या टोळीला रस्त्यावर उतरवत आहेत. एका लेकीने आपले वडील, भावाने आपला भाऊ, आईने आपला मुलगा गमावला आहे. देशमुख यांची हत्या त्यांच्या टोळीतील सदस्याने केली असल्याचे त्यांच्या लक्षात येत नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले.
खंडणीखोरीच्या नादात धनंजय मुंडेंचे अस्तित्व खोलात गेले आहे. ते गप्प बसायला तयार नाहीये. ते मोर्चे काढायला तसेच रास्ता रोको करायला सांगत आहे. आपण मंत्री असून संविधानिक पदावर असल्याचे मुंडे विसरले आहे. मुंडे यांचे चिल्लरचाळे सुरू आहेत. ते जातीय वादाच्या दिशेने जात आहे.लोकांचा यात दोष नाही. मुंडे हे सगळं घडवून आणत आहेत. तुम्ही धनंजय देशमुख यांना धमकी देणार. आम्ही गुंडांना बोलायचे नाही का? त्यांना लोक कापू द्यायचे का? असा सवाल करून त्यांनी मी कोणत्याही जातीचे नाव घेतले नसल्याचे स्पष्ट केले.
गुंड धमक्या देत असतील तर आम्ही बोलायचे नाही का? मुंडे यांनी ओबीसी-ओबीसी करू नये. स्वत:चे प्रताप झाकण्यासाठी त्यांनी ओबीसीचे पांघरून घेऊ नये. पाप करून तुम्ही समाजाचे नाव घेणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मुंडे हे आरोपींच्या मागे उभे राहतात. तसेच प्रतीमोर्चे काढायला सांगतात. तुमच्या घरातील माणूस गेला तर मराठ्यांनी प्रतिमोर्चे काढायचे का? गुंडाना मारू नये का? असा सवाल त्यांनी केला. तसेच आपण राजकारण करत नाही. कोणत्या जातीच्या विरोधात बोलत नाही. असे सांगत मुंडेंनी कुणाला वाचवू नये आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.