Pune : राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर; युवक कॉंग्रेसचा आरोप

महाराष्ट्र सरकार फक्त फोडाफोडीचं राजकारण करत आहे. राज्यातील प्रश्नांचे त्यांना काही घेणं देणं नाही. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. असा आरोप युवक काँग्रेसचे (Youth Congress) राज्याचे प्रभारी उदय भानू यांना सोमवारी (दि.१२) केला.

Youth Congress

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर; युवक कॉंग्रेसचा आरोप

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे: महाराष्ट्र सरकार फक्त फोडाफोडीचं राजकारण करत आहे. राज्यातील प्रश्नांचे त्यांना काही घेणं देणं नाही. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. असा आरोप युवक काँग्रेसचे (Youth Congress)  राज्याचे प्रभारी उदय भानू यांना सोमवारी (दि.१२) केला. 

पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जेष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि ॲड असीम सरोदे यांच्या गाडीवर हल्ला केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली साठी परवानगी मागितली होती. परंतु ती ही वेळेवर नाकारण्यात आली. त्यावेळी भानू यांनी सरकारवर आरोप केला.

परवानगी नाकारल्याने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भावनाबाहेर गाड्या घेण्यास सुरुवात केली. मात्र पुढे जाण्यास निघत असताना पोलिसांकडून त्यांना रस्त्यातच अडवून ताब्यात घेण्यात आले. भाजप कार्यालयावर जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी काँग्रेस भवनातच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. 

यावेळी पोलिसांनी युवक काँग्रेसचे राज्याचे प्रभारी उदय भानु, सहप्रभारी एहसान खान, माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, तारीक बागवान, शहराध्यक्ष राहुल शिरसाट, प्रथमेश अबनावे, रोहित बहिरट, वाहिद नीलगर, ऋत्विक धनवट, आकाश म्हस्के, स्वप्नील नाईक, मुरली बुधाराम, सुजित गोसावी, योगेश यादव, आशुतोष जाधवराव ,अजित ढोकळे, केतन जाधव, ऋषिकेश विरकर, स्वरूप केदारी, ऋणेश कांबळे , रोहित म्हस्के, श्रीनिवास गुट्टे, पवन खरात आदी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडण्यात आले.

यावेळी अक्षय जैन म्हणाले राज्यात वाढत असलेली गुन्हेगारी, पोलिसांवर दिवसाढवळ्या हात उगारणारे भाजपचे नेते, यांच्यावर सरकारचं नियंत्रण नाही, तलाठी भरती घोटाळा असेल व वेगवेगळ्या भरतीतला घोटाळा असेल त्या बाबतीत सरकार पावले उचलण्यात अपयशी ठरलं आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest