परिवर्तन महाशक्तीच्या पहिल्या दहा उमेदवारांची नावे झाली जाहीर
पुणे : विधानसभेचा राजकीय आखाडा चांगला तापला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवार (दि.२२) पासून सुरु होणार आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे घोषित केली जात आहे. रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी आपली ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीनंतर राज्यातील तिसऱ्या आघाडीने म्हणजेच परिवर्तन महाशक्ती आघाडीने आपली पहिली दहा उमेदावारांची यादी जाहीर केली आहे.
महाविकास आघाडी , महायुतीनंतर आता राज्यात तिसऱ्या आघाडी निर्माण झाली आहे. या तिसऱ्या आघाडीला परिवर्तन महाशक्ती असे देण्यात आले आहे. स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांच्यासह शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे आदींची मिळऊन एक महाशक्ती विधानसभेच्या निवडणूकीला सामोरे जाणार आहे. या महाशक्तीने आज पुण्यात विधानसभा मतदारसंघासाठी १० उमेदवारांची नावे जाहिर केली आहेत. महाशक्तीकडे चांगले उमेदवार संपर्क साधत आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार पाडण्यापेक्षा आम्ही उमे केलेल उमेदवार निवडणूक कसे येतील याकडे लक्ष केंद्रीत करणार असल्याचे महाशक्तीच्या नेत्यांनी जाहिर केले आहे.
अचलपूर मतदारसंघातून प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला चार जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून ऐरोली मतदारसंघातून अंकुश सखाराम कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर राजू शेट्टी यांनीही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
गेल्या ७५ वर्षांपासून जनता अस्वस्थ आहे. अजूनही आपण मुलभूत प्रश्नांवरच चर्चा करीत आहोत. इतर राज्यांनी आपला आदर्श घ्यावा, असे आपल्या दिर्घकाळाचे धोरण दिसत नाही. राज्याला पुढे घेवून जाणारे धोरण आपण देणार आहोत. म्हणूनच परिवर्तन शक्तीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चांगेल उमेदवार आमच्याकडे संपर्क साधत आहेत. टप्प्याटप्याने उमेदवारांनी नावे जाहीर केली जाणार आहेत. असे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.
बच्चू कडू म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखिल उमेदवार दिला जाणार आहे. जे चांगले उमेदवार संपर्क साधत आहे. त्यानुसार उमेदवारी घोषीत केली जाणार आहे. चांगली उमेदवार मिळाले तर नक्की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात उमेदवारी देऊ. २८ तारखेला मी उमेदवारीचा अर्ज अचलपूर मतदारसंघातून भरणार आहे.
राज्यात राजकारण नव्हे तर राजकीय टोळी युध्द सुरु आहे. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा हा महाराष्ट्र आहे. परंतु या राजकीय पक्षांच्या टोळी युध्दामुळे राज्याची संस्कृती, प्रगल्भता लयाला गेली आहे. ती भरुन काढण्यासाठी महाशक्तीच्या माध्यमातून राज्याला सशक्त आणि कणखर पर्याय देण्याचा निर्धार केला आहे. असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
उमेदवाराचे नाव : मतदारसंघ : पक्ष
ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू : अचलपूर : प्रहार जनशक्ती पक्ष
वामनराव चटप : राजुरा : स्वतंत्र भारत पक्ष
अनिल छबिलदास चौधरी : रावेर : प्रहार जनशक्ती पक्ष
गणेश रमेश निंबाळकर : चांदवड : प्रहार जनशक्ती पक्ष
सुभाष साबणे बिलोली प्रहार जनशक्ती पक्ष
अंकुश सखाराम कदम : ऐरोली : महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
माधव दादाराव देवसरकर : हदगाव हिमायतनगर : महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
गोविंदराव सयाजीराव भवर : हिंगोली : महाराष्ट्र राज्य समिती
दोन जागांवर स्वाभिमानी
शिरोळ आणि मिरज या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्यात. पण त्यावर कोण उमेदवार असले हे राजू शेट्टी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन घेणार आहेत.