देशाला नारीमुक्तीची नव्हे, नारीशक्तीची गरज

आपल्या देशात नारीमुक्तीचा विचार सातत्याने मांडला जात असला तरी भारताची श्रेष्ठ परंपरा लक्षात घेता आपल्या देशाला नारीमुक्तीची नव्हे, तर नारीशक्तीची गरज असल्याचे प्रतिपादन साध्वी ऋतंभरा यांनी केले.

साध्वी ऋतंभरा म्हणाल्या, ‘‘भारतातील स्त्रियांना जो सन्मान दिला जातो, तसा सन्मान मला विश्वात कुठेही दिसला नाही

साध्वी ऋतंभरा यांचे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि माय होम इंडियाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन

आपल्या देशात नारीमुक्तीचा विचार सातत्याने मांडला जात असला तरी भारताची श्रेष्ठ परंपरा लक्षात घेता आपल्या देशाला नारीमुक्तीची नव्हे, तर नारीशक्तीची गरज असल्याचे प्रतिपादन साध्वी ऋतंभरा यांनी केले.

राजमाता जिजाऊ यांची ४२५ वी जयंती आणि स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि माय होम इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. १२) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांनाराजमाता जिजाऊ गौरव पुरस्कारतसेच युवकांनास्वामी विवेकानंद युवा पुरस्कारदेऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी साध्वी ऋतंभरा म्हणाल्या, ‘‘भारतातील स्त्रियांना जो सन्मान दिला जातो, तसा सन्मान मला विश्वात कुठेही दिसला नाही. समाजात स्वतःचे स्थान महिलांना स्वतः निर्माण करता येते. तप, साधनेने हे शक्य आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, बालकाश्रम ही व्यवस्था समाजासाठी आदर्श व्यवस्था होऊ शकत नाही. कुटुंब आणि संस्कार यातून महिला आदर्श निर्माण करू शकतील.’’ अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम येत आहेत. माझ्या आनंदाला पारावार राहिलेला नाही, असेही त्या म्हणाल्या.

या पुरस्कार प्रदान सोहळ्यात स्वामी जितेन्द्रानंद सरस्वती, जेएनयूच्या कुलपती शांतिश्री पंडित, पद्मश्री मिलिंद कांबळे, सुनील देवधर आणि दिनेश होले उपस्थित होते. यावेळी पुण्याच्या माजी महापौर आणि दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांनाराजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कुणाल टिळक यांनी स्वीकारला. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय कार्यकर्ते दादा वेदक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी मा. का. देशपांडे, विज्ञान भारतीचे काशीनाथ देवधर, जनसेवा बँकेचे संस्थापक वसंतराव देवधर, उद्योजक गजेंद्र पवार, ईशान्य भारतातील कार्यकर्ते प्रशांत जोशी, ॲड. सत्यम सुराणा आदींची उपस्थिती होती.

 
देवधर म्हणाले, राष्ट्राच्या उद्धारासाठी सर्व महिलांनी राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. भारताला विकसित करण्यासाठी, आपल्या युवा पिढीसमोर जिजाऊंचाच आदर्श आहे. युवक आणि युवतींनी जिजाऊंचा आदर्श घेऊनच जीवनात वाटचाल करावी. यावेळी स्वामी जितेंद्रानंद सरस्वती, डॉ. शांतिश्री पंडित,  डॉ. मिलिंद कांबळे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात मुक्ता टिळक (मरणोत्तर) - राजकीय, डॉ. सुचित्रा कराड नागरेशैक्षणिक, ममता सपकाळ - सामाजिक, उषा माळी - शैक्षणिक, उषा वाजपेयी - राजकीय, पुष्पाताई वागळे - राजकीय, सीमा चांदेकर - चित्रपट , शुभांगी भालेराव - सामाजिक, अंजली नंदिनी गायकवाड - संगीत, शैला नाईक - प्राणीमित्र, डॉ. सुप्रिया पुराणिक - वैद्यकीय, प्रतिभा चंद्रन - पत्रकारिता, गीता पेडणेकर - उद्योग, नंदाताई बराटे - सामाजिक, सी. . रचना रानडे - आर्थिक, डॉ. जयश्री तोडकर - वैद्यकीय, पुष्पाताई वागळे - राजकीय, शैला देशपांडे - क्षेत्र समाजसेवा, यांना राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबत विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या १४३ महिलांचा विशेष सन्मानही यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे तुषार दामगुडे, सुखदेव अडागळे, किशोर चव्हाण, शिवशंकर स्वामी, आशुतोष मुगळीकर, नीलेश भिसे, अविनाश तायडे, आशुतोष झा, दत्तात्रेय मिरगणे पाटील, नीलेश धायरकर, आनंद जाधव, महेश पवळे यांना विवेकानंद युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest