मुख्यमंत्री वयोश्री' योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना देणार लाभ

सामाजातील ६५ वर्षे आणि त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगता यावे, त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या आजारपणावर उपचार करता यावेत, यासाठी राज्य सरकारकडून 'मुख्यमंत्री वयोश्री' योजना राबवण्यात येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Desk User
  • Wed, 14 Aug 2024
  • 04:50 am

महासंघासमवेत समाज विकास विभागाने घेतली बैठक, ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये डीबीटीद्वारे मिळणार

सामाजातील ६५ वर्षे आणि त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगता यावे, त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या आजारपणावर उपचार करता यावेत, यासाठी राज्य सरकारकडून 'मुख्यमंत्री वयोश्री' योजना राबवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ पिंपरी-चिंचवड शहरातील वयोवृद्ध नागरिकांनी घ्यावा यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने वल्लभनगर येथील विरंगुळा केंद्रात बैठक पार पडली, यावेळी उपस्थितांना समाज विकास विभागाचे साहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. नलावडे, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, सामाजिक कार्यकर्त्या नम्रता रणसिंग, लिपीक अनिकेत सातपुते तसेच ज्येष्ठ नागरिक महासंघाचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ६५ वर्षे व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना एकावेळ एकरकमी रक्कम रुपये ३ हजार डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या लाभामुळे पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतानुसार साहाय्यभूत चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, लंबर बेल्ट, सवाईकल कॉलर इत्यादी साधने खरेदी करता येऊ शकतात. या योजनेअंतर्गत शासनामार्फत १०० टक्के अर्थसाहाय्य उपलब्ध करणार आहे.

तसेच लाभार्थ्यांना थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे रक्कम रुपये ३ हजार रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देता यावा यासाठी विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघातील पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या वतीने ५ हजार ऑफलाईन अर्जांच्या प्रती आणि स्वयंघोषणापत्र देण्यात आले. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याबाबत आवाहन करण्यात आले. या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन नरळे यांनी केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest