महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा ८७ वा वर्धापन दिन नवी मुंबई येथील कार्यालयात उत्साहात साजरा

ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात.

MPSC News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा ८७ वा वर्धापन दिन नवी मुंबई येथील कार्यालयात उत्साहात साजरा

ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग.  महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात.  होतकरु गरीब उमेदवार केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी पदं मिळवतांना आपल्याला समाजात दिसतात. स्वसुख निरभिलाष: खिद्यते लोकहेतो: अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे या ब्रिद वाक्याप्रमाणेच गेली ८७ वर्षापासुन प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेस आज दिनांक १ एप्रिल, २०२४ रोजी ८७ वर्षे पुर्ण झाली. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्रपूर्व काळात १ एप्रिल, १९३७ रोजी झाली होती.  स्वातंत्र्यापूर्वी बाँम्बे व सिंध लोकसेवा आयोग या नावाने ओळखल्या जाणा-या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग असे नामकरण करण्यात आले.  आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात आज दिनांक १ एप्रिल, २०२४ रोजी मा. अध्यक्ष रजनिश सेठ,  सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, सदस्य डॉ. देवानंद शिंदे, सदस्य डॉ. अभय वाघ,  सदस्य डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात, आयोगाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोगाचा ८७ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोगाची ऐतिहासिक उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे  अध्यक्ष व सदस्यांनी मत व्यक्त केले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest