‘हुजरेगिरी करून ठाकरे मोकळ्या हाताने परतले’

मुख्यमंत्रिपदासाठी तीन दिवस दिल्लीत मुक्काम ठोकून उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत हुजरेगिरी केली. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही, ते कोरड्या चिपाडसह माघारी परतल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. तीन दिवस बैठका, भेटी घेऊन उद्धव ठाकरे यांना रिकामे हात हलवत परत यावे लागल्याचे सांगत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी घणाघाती टीका केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 10 Aug 2024
  • 12:28 pm
Maharastra News, politics, Bharatiya Janata Party, Uddhav Thackeray, Keshav Upadhyay, Spokesperson,  Uddhav Thackeray had to return empty handed.

संग्रहित छायाचित्र

भाजप प्रवक्ते उपाध्ये यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

मुंबई : मुख्यमंत्रिपदासाठी तीन दिवस दिल्लीत मुक्काम ठोकून उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत हुजरेगिरी केली. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही, ते कोरड्या चिपाडसह माघारी परतल्याची टीका  भारतीय जनता पक्षाने केली आहे. तीन दिवस बैठका, भेटी घेऊन उद्धव ठाकरे यांना रिकामे हात हलवत परत यावे लागल्याचे सांगत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी घणाघाती टीका केली. प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

उबाठा गटाच्या दिल्लीवारीतून महाराष्ट्राच्या वाट्याला तर सोडाच, पण उबाठाच्या हाती धुपाटणे  आल्याची कोपरखळी मारून उपाध्ये म्हणाले, महाविकास आघाडीच्या बैठका म्हणजे निव्वळ कोरडे चिपाड आहे. ना चव… ना रस… ना गोडवा… मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वकांक्षेपायी उद्धव ठाकरेंनी दिल्लीचे उंबरे झिजवले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा निवडणुकीनंतर होणार असून ज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री असे सांगून उद्धव ठाकरे यांची निराशा केली आहे. जागावाटपातही कॉंग्रेस मोठा भाऊ असणार असा स्पष्ट संदेश दिल्लीवारीतून उद्धव ठाकरे यांना कॉंग्रेसने दिला. त्यामुळे उबाठा सेनेने स्वाभिमान गमावला आहे.

ते म्हणाले, विधानसभेसाठी जास्त जागा लढवता याव्यात यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवारी केली. त्याही बाबतीत निराशाच पदरी पडली आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या अमित शाहांची तुलना अहमदशाह अब्दालीशी केली, तेच अमित शाह भाजपाचे अध्यक्ष असताना चर्चेसाठी मातोश्रीवर आले होते. २०१९ मध्ये भाजपाने तुमचा सन्मान राखत १२५ जागा दिल्या होत्या. आता तुम्हाला १०० जागा मिळवण्यासाठी काँग्रेसच्या दिल्ली तख्तापुढे झुकावे लागते आहे. जागावाटपात १०० जागाही तुम्हाला मिळणार नाहीत, मग तुमच्या दिल्ली दौऱ्यातून नेमकं पदरी काय पडले, असा प्रश्नही उपाध्ये यांनी केला.

उपाध्ये म्हणाले, महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार प्रामाणिक प्रयत्न करत असताना उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन मविआच्या घटक पक्षातील नेत्यांशी चर्चा करून आरक्षणाबाबत काही ठोस भूमिका घेतील अशी अपेक्षा होती. ती देखील धुळीस मिळाली आहे. ठाकरे हे केवळ हव्यासापोटी दिल्लीला गेले होते. त्यांना महाराष्ट्राच्या व राज्यातील जनतेच्या हिताशी काहीही देणेघेणे नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest