संग्रहित छायाचित्र
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर सध्या तणावाचं वातावरण आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला. या सर्व प्रकरणाची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील, अंबादस दानवे, अदित्य ठाकरे आणि स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजकोट किल्ल्यावरील पोहोचले.
मात्र महाविकास आघाडीचे नेते किल्ल्यावर असताना सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आणि नीलेश राणे हे तिथे उपस्थित होते. राणे समर्थकांनी अदित्य ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली तर ठाकरे समर्थकांनी राणेंच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचं दिसलं. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी देखील झाली. या हाणामारीत महिलाही होत्या. तसेच या ठिकाणी दगडफेकही झाल्याचं बघायला मिळालं.
दरम्यान, दोन्ही गटाचे समर्थक शांत होत नसल्याचं बघून पोलिसांनीही लाठीमार केला. दरम्यान यावेळी पोलिसांनाही धक्काबुक्की झाल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलं आहे.