पुतळे, स्मारके ही केवळ राजकीय सोय, गडकिल्ले हेच खरे वैभव; पुतळ्यावरून राजकारण करणाऱ्यांना राज ठाकरे यांचा टोला

मुंबई: पुतळे, स्मारके ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हटले होते की महाराजांचे खरे स्मारक हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 28 Aug 2024
  • 03:26 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुंबई: पुतळे, स्मारके ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हटले होते की महाराजांचे खरे स्मारक हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचे, मते मागायची, सत्ता मिळवायची आणि मग स्मारकांच्या निविदा काढायच्या, त्यातून काही मिळते का ते बघायचे इतकेच राहिले आहे, अशा शब्दांत पुट्यावरून राजकारण करणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी फटकारले आहे.

अवघ्या आठ महिन्यांपूर्वी ४ डिसेंबर २०२३  रोजी सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर मोठ्या उत्साहात भारतीय नौदल दिन साजरा करण्यात आला. यावेळी किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. मात्र आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळला आहे. त्यामुळे राज्य सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. ही घटना पाहून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या घटनेवरून सरकारची कानउघडणी केली आहे. राज ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वगैरे काही केली होती का नव्हती? आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील ‘पाच पुतळ्यांवरची' कविता आठवली.

ज्यांना माहीत नसेल त्यांनी आवर्जून ही कविता वाचावी. पुतळे, स्मारके ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. या प्रतीकांचे राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उद्ध्वस्त केली पाहिजे आणि तसे घडले तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो,  असे म्हणू शकतो.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest