‘ओबीसी हक्कांसाठी आरक्षण बचाव यात्रा’

राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणावरून वातावरण चांगलेच तापले असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींच्या हक्कांसाठी आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.  २५ जुलै रोजी दादरच्या चैत्यभूमी येथून या यात्रेला प्रारंभ होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 17 Jul 2024
  • 01:00 pm
Maratha-OBC reservation, Vanchit Bahujan Aghadi,  Prakash Ambedkar,  Chaityabhoomi of Dadar, manoj jarange patil

संग्रहित छायाचित्र

दादरच्या चैत्यभूमीवरून २५ जुलैला यात्रेस प्रारंभ -प्रकाश आंबेडकर 

राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणावरून वातावरण चांगलेच तापले असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींच्या हक्कांसाठी आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.  २५ जुलै रोजी दादरच्या चैत्यभूमी येथून या यात्रेला प्रारंभ होणार आहे.

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मागणीला ओबीसींचा विरोध आहे. याबाबत मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक झाली. यात ठोस काहीही निर्णय झाला नाही. आंबेडकर म्हणाले, ओबीसींचा लढा हातामध्ये घ्या. सध्या जी परिस्थिती आहे ती भयानक होत आहे, असे काहीजण म्हणत होते. काहीजण नामांतराची आठवण करून देत आहेत आणि दोन गट पडत चालले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या अनुषंगाने ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद श्रीमंत मराठ्यांनी लावला आहे. हा वाद काय स्वरूप घेईल याची सर्व ओबीसी संघटना आणि नेत्यांना जाणीव आहे. मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन सुरू केलं.

आता आरक्षणासंदर्भात जी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, त्याला सर्व मराठा नेते, मग यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि ठाकरे गटाचे कोणीही उपस्थित नव्हते. मग राजकीय पक्षांची भूमिका काय? हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला. यामध्ये तोडगा काढायचा असेल तर येथील श्रीमंत मराठ्यांचे जे पक्ष आहेत, हे जोपर्यंत भूमिका मांडत नाहीत. तोपर्यंत तोडगा निघत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून विनंती करण्यात आली होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्तिगत सर्वांना पत्र लिहावं. मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यामधून आरक्षण द्या, ही मागणी आहे, यावर राजकीय पक्षांची भूमिका काय, यावर विचारणा करून तोडगा काढण्यात येईल. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की, आम्ही पत्र लिहू. मात्र, याबाबतचे पत्र आलेलं नाही.

मराठा आणि ओबीसींमधील वाद आता फक्त मराठवाड्यापुरता आहे असं मी मानत नाही तर पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशमध्येही पसरत आहे असे सांगून ते म्हणाले, सर्व ओबीसी संघटनांची एक मागणी होती की, वंचित बहुजन आघाडीने यावर भूमिका मांडावी. ती भूमिका गावोगावी गेली पाहिजे. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की या सार्वजनिक संघटनांनाबरोबर घेऊन २५ जुलै रोजी दादरच्या चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव जनसंवाद यात्रेची सुरुवात करायची. त्याच दिवशी पुण्यातील फुलेवाडा येथे जायचं आणि २६ जुलै रोजी आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा सुरू करायची.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest