संग्रहित छायाचित्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुंबई तसेच पालघरमध्ये पंतप्रधान मोदी यांचे दोन कार्यक्रम होणार आहेत. देशातील सर्वाधिक म्हणजेच 20.20 मीटर खोल असणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी 1 वाजता होणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
या बंदराच्या उभारणीसाठी सुमारे 76 हजार 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 2014 पासूनच भारत सरकारने हे बंदर विकसित करण्यात विशेष स्वारस्य दाखवलं होतं. तसेच या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट मानले जात आहे. फेब्रुवारी 2020 मधील सागरमाला प्रोजेक्टमध्येच वाढवण बंदरच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे अजस्त्र कंटेनर इथं येऊ शकतील. तसंच ते कंटेनर लोड-अनलोड देखील करता येतील.
दरम्यान, शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असून मुंबई मध्ये फिनटेक फेस्ट 2024 या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार आहेत.