बुलढाणा : पोलीस कर्मचारी आमदार संजय गायकवाड यांची गाडी धूताना कॅमेऱ्यात कैद

बुलढाण्यात एक पोलीस कर्मचारी चक्क आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुवत असताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हीडीओ फेसबुकवरून पोस्ट केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Admin
  • Fri, 30 Aug 2024
  • 08:05 pm
Police Officer, Sanjay Gaikwad, Vehicle Washing, Buldhana, Harshvardhan Sapkal, Facebook Video, Congress MLA, Caught on Camera, MLA Sanjay Gaikwad’s Vehicle, Buldhana Incident

#बुलढाणा  

बुलढाण्यात एक पोलीस कर्मचारी चक्क आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुवत असताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हीडीओ फेसबुकवरून पोस्ट केला आहे.

संजय गायकवाड हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकात त्यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेरच हा प्रकार घडल्याचा दावा सपकाळ यांनी केला. यावर टीका करताना पोलिसांचे काम सुरक्षेचे आहे की आमदारांच्या गाड्या धुण्याचे, असा सवालही सपकाळांनी उपस्थित केला आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केलेल्या व्हीडीओत एकटा पोलीस कर्मचारी रस्त्यावर उभी असलेली गाडी धुताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याच्या अंगावर खाकी आहे. हा व्हीडीओ पोस्ट करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या व आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहे, की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी? अशी विचारणा केली आहे.

तसेच पोलीस यंत्रणेची चाटुगिरी सिद्ध झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोस्टमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी लिहिले आहे की, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र पोलीस शर्म करो ! सदरक्षणाय, खलनिग्रहणाय हे ब्रीद अंगीकारणारी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या व आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहे की, आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी?".

"दोन दिवसांपूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केले होते. मुख्यमंत्री काय शाळेत जाऊन पहारा देणार आहेत का? एस. पी. आरोपीच्या घरी जाऊन बसणार आहेत का? आज सकाळी या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार आहे ! पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना. पोलीस यंत्रणेची चाटुगिरी सिद्ध. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest