संग्रहित छायाचित्र
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणामुळे बदलापूर मधील लोक रस्त्यावर उतरले आणि उत्स्फूर्त आंदोलन झालं. संतप्त पालक, आंदोकांनी शाळेत तोडफोड केली. तसेच सुमारे १० तास रेल रोको केला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अक्षय शिंदे हा त्या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. शाळेत तो बाथरूम सफाईचं काम करत होता.
दरम्यान, अक्षयच्या आईवडिलांनी आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला आहे. त्याला या प्रकरणात फसवण्यात आलं असल्याचा आरोप त्यांनी केला असून पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी तक्रार दाखल केली आहे. आपल्या मुलाला मारहाण करण्यात आली असून त्याला या प्रकरणात फसवण्यात आलं आहे. त्याची मेडिकल चाचणी करण्यात यावी. त्यामध्ये अक्षयच्या निर्दोषतेचा पुरावा मिळू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर मधील लोकांनी अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांना गावातून हुसकावून लावलं आहे. त्याच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. अक्षय हा २४ वर्षांचा असून त्याची ३ लग्न झाली आहेत. पण एकही पत्नी त्याच्यासोबत राहत नाही.