विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा २८ जुलै रोजी शपथविधी

मुंबई - नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत नवनिर्वाचित झालेल्या सदस्यांचा २८ जुलै रोजी शपथविधी होणार आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 25 Jul 2024
  • 04:35 pm
Legislative Society, Neelam Gorhe

संग्रहित छायाचित्र

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना देणार शपथ

मुंबई - नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत नवनिर्वाचित झालेल्या सदस्यांचा २८ जुलै रोजी शपथविधी होणार आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणार आहेत. 

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी  १२ जुलै रोजी मतदान पार पडले. यावेळी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून शपथ दिली जाणार आहे. 

यामध्ये योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडणार आहे.

विधानभवनातील सेंट्रल हॉल मध्ये रविवारी (२८ जुलै) रोजी सकाळी ११ वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest