Maratha Reservation: देवेंद्र फडणवीसांना सुट्टीच नाही

अंतरवाली सराटी: मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याआधी जरांगे यांनी फडणवीस यांच्याकडून मारण्यासाठी षडयंत्र रचले गेल्याचा आरोप केला होता.

Maratha Reservation Protest

संग्रहित छायाचित्र

महिलांच्या आडून माझ्यावर हल्ल्याचा डाव, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा साधला निशाणा

अंतरवाली सराटी: मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी  पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  याआधी जरांगे यांनी फडणवीस यांच्याकडून मारण्यासाठी षडयंत्र रचले गेल्याचा आरोप केला होता.  सलाईनद्वारे मला मारण्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला होता. अशातच फडणवीसांनी संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) महिलांच्या आडून हल्ला करण्याचा डाव असल्याचा दावा आता मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

विशेष म्हणजे जरांगे हे हेतुपूर्वक फडणवीसांना टार्गेट करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता जरांगे पाटील यांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. देवेंद्र यांनी दुसरा हल्ल्याचा डाव रचला, असा अंदाज दिसत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत आहे. मी आता बाहेर पडलो आहे, मलाही पाहायचय कोणता भाजपचा कार्यकर्ता येतो, हल्ला करायला हे मला पाहायचे असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

कारण हे जर खोटे असेल तर हा प्रयोग त्यांना बहुतेक संभाजीनगरला करायचा होता. छत्रपतींचे विचार आम्हाला सांगायचे की महिलांचा आदर करायला पाहिजे आणि इकडे महिला पाठवता. १० टक्के आरक्षण स्वीकारण्यासाठी इतक्या खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्याला शोभत नाही. तुम्हाला सुट्टी नाही, तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादी लागला असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे आता तीन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांच्यावर परत एकदा मनोज जरांगे यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांनी याआधी केलेल्या आरोपांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली आहे. 

जरागेंनी पहिल्यांदा आरोप केले तेव्हा भाजपच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. इतकंच नाहीतर सुरुवातीला जेव्हा अंतरावली सराटी येथे  लाठीचार्ज झाला त्याआधी राजेश टोपे यांच्या कारखान्यामध्ये मराठा आंदोलक असल्याचा आरोप केला होता. यावर आता फडणवीस काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest