आता मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधातच उपोषण

बार्शी: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य ढवळून काढले. मात्र त्यांच्या आंदोलनाचे फलित काय असा सवाल आता त्यांचे कार्यकर्ते विचारू लागले आहेत. वाशी येथे तर समाजाच्या अनेक मोठ्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 4 Sep 2024
  • 12:27 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अजून किती जातींशी वैमनस्य घ्यायचे? बार्शी तालुक्यातील मराठा नेते अण्णासाहेब शिंदे यांचा सवाल

बार्शी: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य ढवळून काढले. मात्र त्यांच्या आंदोलनाचे फलित काय असा सवाल आता त्यांचे कार्यकर्ते विचारू लागले आहेत. वाशी येथे तर समाजाच्या अनेक मोठ्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. त्यालाही आता वर्ष उलटले आहे. आता आणखी किती जातींशी वैर घ्यायचे, असा सवाल करत बार्शीचे मराठा समाजाचे नेते अण्णासाहेब शिंदे (Annasaheb Shinde) यांनी येत्या आठ दिवसांनी जरांगे पाटलांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. राज्य सरकारच्या नाकात त्यांनी दम आणला. या आंदोलनला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. वाशी येथे तर समाजाच्या अनेक मोठ्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. पण एक वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या हाती काय लागले, असा उद्वेग स्वतः जरांगे पाटील यांनी नुकताच अंतरवाली सराटी येथे केला होता. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिला. त्यानंतर आपण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यातच आता खुद्द जरांगे पाटील यांच्याविरोधातच एका उपोषण होऊ घातले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का? सोलापुरातील बार्शी तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी  मनोज जरांगे पाटील यांना असा सवाल विचारला आहे. आठ दिवसांत या प्रश्नांची उत्तरे न दिल्यास मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उपोषणाला बसणार, अशी घोषणा करण्यात आली आहे. बार्शी तालुक्यातील मराठा नेते अण्णासाहेब शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांना सवाल केला आहे.

महाविकास आघाडीचा भरवसा काय?
महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर किती दिवसात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार हे त्यांच्याकडून लिहून घ्या. मनोजदादा यापूर्वी मराठा-मुस्लिम वाद, मराठा-दलित वाद आणि आता मराठा ओबीसी वाद सुरू आहे. त्यामुळे आणखी किती जातींशी वैमनस्य घ्यायचे ते सांगा, असा सवाल शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला आहे. मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पाडून आपण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवणार आहात. हा  मराठा समाजावर अन्याय करणार नाही का? पुढील आठ दिवसांत माझ्या या प्रश्नांचे उत्तर न दिल्यास बार्शीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest