कुख्यात गुन्हेगार अरुण गवळीची पॅरोलवर सुटका करण्यास नकार

कुख्यात गुन्हेगार अरुण गवळीला पॅरोलवर सुटी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे अरुण गवळीला तुरुंगातच राहवे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 1 Aug 2024
  • 09:58 am
Supreme Court, notorious criminal Arun Gawli, Daddy on bail, High Court, arun gavli viral, arun gavli bail,  Supreme Court against this decision.

संग्रहित छायाचित्र

नागपूर खंडपीठाने दिला होता सुटकेचा आदेश, आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई : कुख्यात गुन्हेगार अरुण गवळीला पॅरोलवर सुटी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे अरुण गवळीला तुरुंगातच राहवे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी  उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीवेळी अरुण गवळीला पॅरोल मंजूर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. 

या याचिकेवरील पुढची सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. अरुण गवळीने वयाचे कारण देत सुटी देण्याची मागणी केली होती. अरुण गवळीला न्यायालयाने दिलेल्या मुदतपूर्व सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर नोव्हेंबरमध्ये न्यायालय दोन्ही बाजू ऐकणार आहे. नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो नागपूर तुरुंगात शिक्षा भोगत आहे. यामध्ये १४ वर्ष शिक्षा अरुण गवळीने भोगली असून आता ६५ पेक्षा जास्त वय असल्यामुळे शिक्षेतून सुटमिळावी, अशी मागणी अरुण गवळीच्या वकिलानी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

२ मार्च २००७ रोजी घाटकोपरमध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर घरात टीव्ही पाहात होते. असल्फा व्हिलेजच्या रुमानी मंजिल चाळीत ते राहात होते. जामसंडेकर यांनी त्यावेळी अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणेंचा ३६७ मतांनी पराभव केला होता. जामसंडेकर यांच्या पत्नी कोमल कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. जामसंडेकर यांची भाची मनाली हिरे स्वयंपाक घरात काम करत होती. इतक्यात घराबाहेर दोन मोटरसायकल येऊन थांबल्या होत्या. त्यावरुन चार लोक उतरले. त्यातला एकजण हा जामसंडेकर यांच्या घराकडे आला आणि बंदुकीने जामसंडेकर यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार केला. हा गोळीबार अत्यंत जवळून म्हणजेच पॉईंट ब्लँक रेंजवरुन करण्यात आला. गोळीबार झालेला पाहून मनाली धावत बाहेर आली, तेव्हा कमलाकार जामसंडेकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिला दिसले. 

गर्दीचा फायदा घेऊन हल्लेखोर तिथून पळाले. कमलाकार जामसंडेकर यांना रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला. मात्र पोलिसांना सुगावा लागत नव्हता. त्यावेळी त्यांना समजलं की या हत्येचे धागेदोरे एका आमदारापर्यंत पोहचले आहेत. अर्थातच तो होता गुन्हेगार अरुण गवळी. त्यामुळे याच प्रकरणात अरुण गवळीला अटक झाली. जामसंडेकर यांच्या हत्येनंतर जवळपास वर्षभराने ही बाब उघड झाली ही सुपारी अरुण गवळीने दिली. अरुण गवळी त्यावेळी भायखळा मतदारसंघाचा आमदार होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest