एमपीएससीने पीएसआयची मैदानी चाचणी पुढे ढकलली ; नेहमी प्रमाणे तारीख नाही सांगितली; महिला उमेदवारांना मिळाला दिलासा; तयारीसाठी मिळणार पुरेसा वेळ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) (MPSC) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ या परीक्षेतीस पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गाकरीता १५ एप्रिल २०२४ ते २ मे २०२४ या कालावधीत शारीरिक चाचणी आयोजित केली होती.

MPSC PSI Field Test Postpones

एमपीएससीने पीएसआयची मैदानी चाचणी पुढे ढकलली

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) (MPSC) घेण्यात येणाऱ्या  महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ या परीक्षेतीस पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गाकरीता १५ एप्रिल २०२४ ते २ मे २०२४ या कालावधीत शारीरिक चाचणी आयोजित केली होती. परंतु लोकसभा निवडणुकीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे एमपीएससीने बुधवारी (दि. ४) घोषणी पत्रकाद्वारे जाहीर केले. मात्र यावेळी देखील एमपीएससीने शारीरिक चाचणी कधी घेतली जाणार याची तारीख जाहीर केली नसल्याने नियोजनात शुन्य असल्याचे सिध्द केले आहे. 

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा- २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. मात्र राज्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त व कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक असल्याने शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी कळविले आहे. हे विचारात घेता शारीरिक चाचणीचा दिनांक १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीतील नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असून, शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. असे एमपीएससीने जाहीर केलेल्या घोषणा पत्रकात नमूद केले आहे. 

एमपीएससीने शारीरिक चाचणीत बदल केल्याने तसेच एक महिन्याच्या कालावधीत शारिरीक चाचणी होत असल्याने तयारीसाठी उमेदवारांना वेळ वाढवून हवा होता. मात्र एमपीएससीने तसे नकरता लोकसभा निवडणुकांमुळे पीएसआयची शारीरिक चाचणीची परिक्षा ही १५ ते २७ एप्रिल दरम्यान १९, २६ आणि २७ एप्रिल रोजी होणारी शारीरिक चाचणीची परिक्षा ही २९, ३० एप्रिल आणि आणि ०२ मे २०२४ रोजी पोलीस मुख्यालय नवी मुंबई येथे होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी मैदानी चाचणी घेणे शक्य नसल्याचे कारण देत मैदानी चाचणी पुढे ढकलली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पोलिसांसह सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कामकाज दिले जाते. याची प्रत्येक विभागाल माहिती असते. तरी देखीस एमपीएससीने कोणतेही नियोजन करता सरसकट ताराख जाहीर करुन ढिसाळ नियोजनाचे प्रदर्शन दाखविले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.  

महिला उमेदवारांना दिलासा... 

पीएसआयच्या शारीरिक चाचणीच्या निकषांमध्ये २०२१ मध्ये बदल करण्यात आला होता. उमेदवारांना तयारीसाठी एक वर्ष मिळाले असतानाही त्यावर्षी ११२ जागांपैकी फक्त ६४ मुली पात्र ठरल्या होत्या. आता तर फक्त एक महिन्याचाच कालावधी मिळाला आहे. १३ मार्च रोजी मुख्य परीक्षेचा निकाल लागला होता. एका महिन्यातच शारीरिक चाचणीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नवे निकष महिला उमेदवारांसाठी बदलले असून, पोलिस कॉन्स्टेबल आणि इतर राज्यांच्या तुलनेत ते अवघड आहे. अपुऱ्या वेळेत आणि वाढत्या उन्हाळ्यात ही तयारी करणे जवळपास अशक्य आहे. महिला उमेदवारांचा मागील भरतीत टक्का घसरला आहे. तसेच २०१५ ते २०२१ या दरम्यान कधीही एमपीएससीने भर उन्हाळ्यात अशा प्रकारची परीक्षा घेतली नाही. परीक्षा कालावधी जरी सकाळचा असला तरीही त्यासाठी लागणारा सराव दररोज उन्हात करावा लागत आहे, असेही उमेदवारांचे म्हणणे होते.  

एमपीएसीने शारिरीक चाचणीमध्ये बदल केले आहेत. महिला उमदेवारांच्या मैदानी चाचणीच्या काठिण्य पातळी वाढ झाली आहे. त्यामुळे 

तयारी करण्यासाठी अधिक वेळ हवा होता. एमपीएससीने मैदानी चाचणी पुढे ढकलल्यामुळे सर्व महिला उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 - सुप्रिया, महिला उमेदवार. 

मैदानी चाचणीमध्ये झाल्याने महिला उमेदवार तणावाखाली होत्या. अवघ्या एका महिन्यात मैदानी चाचणी होणार होती, त्यामुळे आता ही चाचणी पुढे ढकलल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एमपीएससीने विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करण्यासाठी पुढे ढकलेल्या परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात. 

-  महेश बडे, प्रमुख स्टूडंट्स राईट्स असोसिएशन.

 पीएसआय पदाची मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी महिला उमेदवारांनी केली होती. त्याला नकार देत एमपीएससीने नवीन तारखा जाहीर केल्या होत्या. मात्र विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या आदेशाने का होईना मैदानी चाचणी पुढे ढकलली, यामुळे तरी आता या उमेदवारांना मोठा दिलासा मिळेल.  

 - महेश घरबुडे, कार्याध्यक्ष- स्पर्धा परीक्षा समन्वय समिती.

परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा... 

- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २८ एप्रिलला होणार होती, ती अचानक पुढे ढकलली. तीन आठवडे होऊनही नवीन तारीख जाहीर नाही. 

- समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि  इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब  ही परीक्षा १९ मे ला नियोजित होती.  याची नवीन तारीख जाहीर नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest