सरकारी नोकरीमध्येही घोडेबाजार; एमपीएसीने दिलेल्या ऑप्टींग आऊट पर्यायाचा वापर होतोय चुकीचा, उमेदवार त्रासले
पुणे: राज्याच्या सत्ताकारणात सध्या राजकारण्यांचा घोडेबाजार चांगलाच तेजीत आहे. पैशांच्या पेट्या घेतल्याशिवाय कोण कोणाला मदत करत नाही. असे बोलले जाते. अशी परिस्थिती राजकारणात विविध टप्प्यावर दिसून येते. त्याच धर्तीवर आता सरकारी नोकरीमध्ये (Govt job) देखील मोठ्या प्रमाणात घोडे बाजार सुरु असल्याची चर्चा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात रंगली आहे. एमपीएसीने दिलेल्या ऑप्टींग आऊट या पर्यायाचा चुकीचा वापर सुरु असून एक पद आधिच मिळालेल्या उमेदवाराने दुसरे पद सोडावे अथवा पद सोडतो. असे सांगून पैशांची मागणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या अतिंम निकालापूर्वी ज्या उमेदवाराची निवड झालेले पद हवे किंवा नको, याबाबतची माहिती ऑप्टींग आऊट या पर्यायाच्या माध्यमातून सांगता येते. हा पर्याय वापरला कि त्या उमेदवाराचा त्या पदावरील दावा संपुष्टात येवून त्याजागी दुसऱ्या उमेदवाराला संधी मिळते. नेमके याचाच फायदा घेवून मिळालेल्या पदापेक्षा वरचे पद आधिच मिळालेले असून सुध्दा ते पद सोडले जात नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरुन दिसून येत आहे. संबंधित उमेदवाराने पद सोडले तर आपल्याला सरकारी नोकरी लागेल यापेक्षेने उमेदवार निवड झालेल्या उमेदवाराला संपर्क साधत आहे. तसेच पद सोडतो मला आमुक पैसे दे असे सांगून पैशांचा घोडेबाजार केला जात असल्याची खरपूस चर्चा परीक्षा क्षेत्रात रंगली आहे. त्यामुळे हा घोडे बाजार रोखण्यासाठी ऑप्टींग आऊटला वेळेची मर्यादा असायला हवी, अशी मागणी उमेदावारांनी सीविक मिररशी बोलताना केली. प्रशासनात जाण्याअधिच काही निवडक उमेदवारांमध्ये भ्रष्टाचारी बीजे रूवजले जात असल्याने या पर्यायाबाबत एमपीएससीने गांभिर्याने विचार करावा, असेही उमेदवारांचे म्हणणे आहे.
ऑप्टींग आऊट हा उमेदवारांच्या चांगल्यासाठी लागू केलेला पर्याय आहे. मात्र याचा गैरफायदा घेतला जात असून, यासाठी वेळेची मर्यादा घालण्याची मागणी उमेदवार करत आहेत. एमपीएससीत चाललेला संथ कारभार आणि त्यामुळे परीक्षांचे निकाल लागण्यास लागणारा वेळ ही बाब सीविक मिररने प्रकाशात आणली होती. त्यानंतर एमपीएएससी आता निकाल लावणे सुरु आहे. तसेच लोकसभा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर वेगाने निवड याद्या जाहीर केल्या जात आहेचत. मात्र याद पसंतीक्रम न देता थेट गुणवत्ता यादी जाहीर केली होती. त्यात ऑप्टींग आऊटचा उमेदवार गैरफायदा घेत असल्याची चर्चा रंगली आहे. गट ब आणि आता राज्य सेवेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑप्टींग आऊट हा पर्याय वापरुन बाहेर पडण्यासाठी एमपीएससीने सात दिवसांची वेळ दिली आहे. शेवटचा एक दिवस राहिलेला असताना दोन्ही परीक्षांचे मिळून सुमारे ५० उमेदवारांनी या आधी एक पद मिळालेले असतानाही ऑप्टींग आऊटचा पर्याय निवडलेला नाही. त्यामुळे एका दिवसात मोठा घोडेबाजार होण्याची शंका व्यक्त केली जात आहे. सरकारी मिळवताना पैसे मोजल्यानंतर संबंधित उमेदवार प्रामाणिक काम करणार की मोजलेले पैसे
''एक व्यक्ती एक पद''
एमपीएससीने भरती प्रक्रियेत ‘एक व्यक्ती एक पद’ ही कार्यपद्धती राबवावी. गुणवत्ता यादी जाहीर करण्यापूर्वी निवड झालेल्या उमेदवाराला पदाचा पसंती क्रमांक दिला जावा. त्यानंतर ऑप्टींग आऊट हा पर्याय निवडण्यासाठी ७२ तासांचा वेळ देण्यात यावा. जेणेकरुन यामध्ये कोणातीहा काळाबाजार होणार नाही. जर एखाद्या उमेदवाराने तसे न केल्यास त्याची कोणत्याही एका पदावरील निवड ग्राह्य धरावी व इतर पदांवरील निवडी रद्द करण्यात याव्यात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोणतीही पदभरतीसाठी सुमारे एक ते दोन वर्षांचा कालावधी लागतो असे दिसून येते. एमपीएससीने उमेदावारांच्याच भल्यासाठी ऑप्टींग आऊटचा पर्याय दिला आहे. मात्र, त्याला वेळेची मर्यादा नसल्यामुळे गैरफायदा घेतला जात आहे. आयोगाने उमेदवाराला पसंतीचे पद निवडण्यासाठी ७२ किंवा ४८ तासांची मुदत द्यावी, जेणेकरून या भ्रष्टाचारास आळा बसेल.
- महेश बडे, एमपीएससी स्टुडंट राईट्स
ज्यांना या दोन परीक्षांमधील पदापेक्षा वरिष्ठ पद मिळालेले आहे, किंवा निवड झालेल्या पदे घेयचे नसले तर ऑप्टींग आऊटचा पर्याया या उमेदवारांनी निवडणे आवश्यक आहे. मात्र सध्याच्या परिस्थिती सुमारे ५० उमेदवारांना एक पद मिळालेले असताना हा पर्याया निवडला जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याप्रकारात घोडेबाजार होण्याची शक्यता अधिक आहे. यापूर्वी देखील असे प्रकार घडलेला आहे. त्यामुळे आताच्या उमेदवारांनी प्रतिक्षेत असलेल्या उमेदावारांचा विचार करावा. परीक्षेच्या अंतिम टप्प्यावर असताना त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरु देऊ नका, उमेदवारांच्या भविष्याचा विचार करावा.
- महेश घरबुडे, कार्याध्यक्ष - स्पर्धा परीक्षा समन्वय समिती.