संग्रहित छायाचित्र
येत्या ७ ते ८ जूनला मान्सून तळकोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच पुढील दोन दिवस राज्याच्या मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
येत्या २ ते ३ दिवसांत मान्सून कर्नाटक राज्यात दाखल होईल. त्यानंतर ७ ते ८ जून पर्यंत मान्सून सिंधुदुर्गात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला होता. परंतु लवकरच मान्सून राज्यात दाखल होण्याचा अंदाज वर्तवल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
तत्पूर्वी मान्सूनपूर्व पाऊस राज्यात दाखल होणार असून पुढील काही दिवस मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.