मराठवाड्यात पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी?

विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. पुढील दोन-तिन महिन्यांनी विधानसभा निवडणुका राज्यात होतील. त्या आधी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 22 Jul 2024
  • 11:27 am
 Maratha and OBC reservation is in vogue, Assembly elections held, maratha vs obc, reservation, Manoj Jarange Patil

संग्रहित छायाचित्र

शांतता रॅलीनंतर आता 'ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा' , 'विधानसभा निवडणुकीपूर्वी वारे फिरणार?

जालना: विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. पुढील दोन-तिन महिन्यांनी विधानसभा निवडणुका राज्यात होतील. त्या आधी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. उपोषणाला बसण्याआधी त्यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली मराठवाड्यात झाली. त्याला मोठा प्रतिसादही मिळाला. आता त्या पाठोपाठ ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातले वातावरण आरक्षणाच्या मुद्द्यावर आणखी तापण्याची दाट शक्यता आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी ओबीसींची मागणी आहे. ओबीसींचे आरक्षण टिकले पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. त्यासाठी आता ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. त्यामुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा काढणार आहेत. ही यात्रा २२ ते २५ जुलैपर्यंत चालणार आहे. सुरुवातीला ही यात्रा जालना, बीड, परभणी, जिल्ह्यातून जाणार आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे.

या निमित्ताने मराठवाडा पुन्हा एकदा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रेआधी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली कढली होती. या रॅलीचे केंद्रही मराठवाडाच होता. मराठवाड्याच्या जिल्ह्यातून ही यात्रा निघाली. या यात्रेलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर जरांगे पाटील हे उपोषणालाही बसले आहेत. ते ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे यावर ठाम आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

एकीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाची ही ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा निघत आहे. शिवाय वंचितचे प्रकाश आंबेडकरही आरक्षणासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातले वातावरण आरक्षणावरून चांगलेच ढवळणार आहे. २५ जुलैपासून प्रकाश आंबेडकरांची देखील आरक्षण बचाव यात्रा निघणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे वारे कोणत्या दिशेने फिरणार हे ठरवणाऱ्या या यात्रा असणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपसाठी अडचणीचा ठरला होता. लोकसभेला त्याचा मोठा फटका महायुतीला बसला. महाविकास आघाडीने राज्यात जोरदार मुसंडी मारली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest