Maharashtra Police: उपायुक्त-सहायक आयुक्तांच्या बदल्या

पुणे : राज्य शासनाने पुण्यातील २१ उपायुक्त-सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या केल्या. यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

Police Transfer News

संग्रहित छायाचित्र

वाहतूक उपायुक्त शशिकांत बोराटे यांचा समावेश

पुणे : राज्य शासनाने पुण्यातील २१ उपायुक्त-सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या केल्या. यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांची ठाणे शहरात बदली करण्यात आली आहे.  तर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांची नाशिकच्या पोलीस अकादमीच्या अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. लोहमार्गच्या अतिरिक्त अधीक्षक माधुरी कांगणे यांची पिंपरी चिंचवडच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सहाय्यक आयुक्त वसंत कुवर यांची अहमदनगर, जात पडताळणी विभागात बदली करण्यात आली आहे. तर, पिंपरी चिंचवडचे सहायक आयुक्त विवेक मुगळीकर यांची रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे, विठ्ठल कुबडे यांची सोलापूर येथे बदली करण्यात आली आहे. तर, छत्रपती संभाजीनगरचे सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांची पुणे शहर, सोलापूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजू धोंडीराम मोरे यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest