Maharashtra Police: महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला

पुणे: भारतीय पोलीस सेवेतील (IPS) वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी (Director General of Police Maharashtra) नियुक्ती झाली

संग्रहित छायाचित्र

रश्मी शुक्ला या १९८८ सालच्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या भारतीय पोलीस अधिकारी

पुणे: भारतीय पोलीस सेवेतील (IPS) वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी (Director General of Police Maharashtra) नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्या १९८८ च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या भारतीय पोलीस अधिकारी आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होण्याआधी त्या सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी आणि त्याआधी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होत्या.

केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याआधी महाराष्ट्रात त्या पुणे पोलीस आयुक्त, राज्य गुप्तचर विभागाच्या संचालक अशा विविध पदांवर कार्यरत होत्या. महाराष्ट्रात असताना त्यांची कारकीर्द वादळी ठरली होती. राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी संजय राऊत, एकनाथ खडसे तसेच नाना पटोले यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासंदर्भात त्यांच्यावर मुंबई आणि पुणे येथे दोन एफआयआरही दाखल झाले आहे.

मात्र झालेले आरोप रश्मी शुक्ला यांच्याकडून फेटाळण्यात आले आहे आणि आपल्या कारकिर्दीत आपण राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकसेवेला प्राधान्य दिल्याचे त्यांनी म्हटले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest