महाराष्ट्रात महाविकास आघाडीची महायुतीवर मात; महाविकास आघाडीला २५ तर महायुतीला २२ जागा
एक्झीट पोलचे आकडे हळुहळु येऊ लागले असून टीव्ही ९ -पोलास्टारच्या मते महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीवर मात केली असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीला २५ तर महायुतीला २२ जागा मिळणार असल्याचे म्हटले आहे. धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एकही जागा मिळालेली नाही. बारामतीतूनही सुनेत्रा पवार यांचा पराभव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (exit poll 2024)
या एक्झीट पोलनुसार भारतीय जनता पक्षाला १८, शिवसेना एकनाथ शिंदे गटाला ४, शिवसेनेचा उध्दव ठाकरे गटाला १४, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला ६ जागा आणि कॉग्रेसला ६ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे, अमरावतीतून भाजपच्या नवनीत राणा, माढा मतदारसघातून शरद पवार गटाचे धैर्यशील माहिते, सोलापूरमध्ये कॉग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर दिसत आहेत.
देशपातळीवर मात्र पंतप्रधान नरेंद्र माेदींचा करिष्मा चालला असून एनडीए,ला ३५३ ते ३६८ आणि इंडिया आघशडीला ११८ ते १३३ जागा मिळत आहेत. हा केवळ अंदाज आहे.